शिरूर (प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्यातील नोव्हेंबर २००५ नंतर चे सर्व कर्मचाऱ्यांना १९८२व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत चालू करण्यासा...
शिरूर (प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्यातील नोव्हेंबर २००५ नंतर चे सर्व कर्मचाऱ्यांना १९८२व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत चालू करण्यासाठी शिरूर पंचायत समिती व तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या विषयीचे विविध संघटनांनी नायब तहसिलदार सुवर्णा खरमाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक व इतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य २००५ नंतरच्या नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप पुकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शेजारील पश्चिम बंगाल ,राजस्थान छत्तीस गड,झारखंड पंजाब ,हिमाचल प्रदेश या राज्यांनी पेन्शन योजना पूर्ववत लागू केली.महाराष्ट्र सरकार ही योजना देण्यासाठी दुर्लक्ष करत असून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या रोषास पात्र ठरत असल्याचे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष माऊली पुंडे यांनी सांगितले.जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत संप बेमुदत चालू राहणार आहे.असे शिरूर तालुका अध्यक्ष संतोष थोपटे यांनी सांगितले.
पेन्शन वरील खर्च १३४०० कोटी रुपये वरून ५६३०० कोटी वर गेला असून हा कल पाहता २०३२ मध्ये २२५००० कोटी रुपये इतका खर्च असेल ही एकच बाजू उपमुखमंत्री यांनी सांगितले याची दुसरी बाजू ती म्हणजे महसूल जमा एक कोटी बेचाळीस हजारनऊशे सत्तेचाळीस वरून चार कोटी तीन हजार चारशे सत्तावीस रुपयावर गेली असल्याचे सोयीस्कर टाळले.महसूल जमेच्या तुलनेत पेन्शन दायित्व आठ टक्के ते बारा टक्के राहिलेले आहे .हाच कल पाहता २०३२ मध्ये दोन कोटी पंचीवस हजार रुपये पेन्शन चे दायित्व असेल पण याच प्रमाणात २०३२ रोजी महुसूल जमा अठ्ठावीस ते बत्तीस लक्ष कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सोयीस्कर टाळले .
त्यामुळे कसलाही पेन्शन बोजा हा सरकारवर पडणार नसल्याचे जिल्हा कोषाध्यक्ष मानसिंग वाकडे यांनी सांगितले . आमदार व खासदार यांनी पेन्शन घ्यावी पण इतर कर्मचारी यांना का देत नाही असा सवाल राज्य सरचिटणीस अनिल पलांडे यांनी यावेळी केला.जोपर्यंत पेन्शन संप जोपर्यंत पेन्शन सरकार देत नाही तोपर्यंत संप चालू राहील अशी घोषणा कोषाध्यक्ष माऊली पुंडे यांनी सांगितले. .यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, शिक्षक संच राज्य अध्यक्ष सुरेश सातपुते, पदवीधर राज्य संघटनेचे सरचिटणीस अनिल पलांडे, पुणे जिल्हा अखिल भारतीय शिक्षक संघ अध्यक्ष शिवाजीराव वाळके,जिल्हा कोषाध्यक्ष माऊली पुंडे,जिल्हा कार्याध्यक्ष शिक्षक समितीचे अविनाश चव्हाण ,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उत्तम भंडारी,बापूसाहेब लांडगे, संतोष शेवाळे, दिपक सरोदे,लहू शितोळे,विलास गावडे,ज्ञानेश्वर पवार, कल्याण कोकाटे, दयानंद माने,किरण शिरतार,साधना खोमणे, ग्रा.संघटनाअध्यक्ष रमेश जासूद,सुनिल निचीत, यावेळी शिक्षण विभाग ,ग्रामसेवक, वन विभाग,आरोग्य विभाग अंगणवाडी पर्यवेक्षिका, व विविध आस्थापना व सर्व खात्याचे कर्मचारी उपस्थित होते. जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष बबनराव म्हाळ सकर,सरचिटणीस संतोष गावडे,कोषाध्यक्ष आनंद लोंढे यांनी मोर्चा चे नियोजन केले.
COMMENTS