शिरूर, (प्रतिनिधी )- उद्योगपती स्व.रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जयंती निमित्त येथील शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात...
शिरूर, (प्रतिनिधी )-
उद्योगपती स्व.रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जयंती निमित्त येथील शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
उद्योगपती स्व.रसिकभाऊ माणिकचंद धारिवाल यांच्या जयंतनिमित्त उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारिवाल मित्र मंडळ व मोरया जीम हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.
शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते उद्योगपती प्रकाश धारिवाल
व आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून रक्तदान शिबीरास सुरूवात करण्यात आले.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, उपनगराध्यक्ष जाकिर खान पठाण,शिरूर नगरपरिषदेचे बांधकाम समितीचे सभापती अभिजित पाचर्णे,रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, प्रकाश धारिवाल मंडळाचे प्रशांत शिंदे ,तुकाराम खोले,संतोष शितोळे,मोरया जिमचे योगेश जामदार , सुशांत कुटे, सागर पांढरकामे, किरण बनकर,विशाल जोगदंड, आदींनी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. दरम्यान, नागरिकांनी या रक्तदानाशिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रत्येक सहभागी रक्तदात्यास प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह व एक भेटवस्तू देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.अर्पण ब्लड बँक नगर, ससून रुग्णालय पुणे, आनंद ब्लड बँक अहमदनगर,आदींचे रक्तदान शिबीरास विशेष सहकार्य लाभले.
COMMENTS