शिरूर ( प्रतिनिधी) - स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालक आज मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहे. परंतु लोकसंखेच्या तुलनेत आज नोक-या उपलब्ध नाहीत...
शिरूर ( प्रतिनिधी) - स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालक आज मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहे. परंतु लोकसंखेच्या तुलनेत आज नोक-या उपलब्ध नाहीत. यामुळे मराठी तरुणानी उद्दोग व्यवसायाकडे वळावे असे मत महाराष्ट्र राज्य आखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुलाबराव गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पांचगे.जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे,शैलेजा दुर्गे,सरपंच संगीता शेवाळे तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे उपस्थित होते.
शिरूर शहरात रविवारी सायंकाळी अखिल भारतीय मराठा महासंघ जिजाऊ जयंती, निमित्त घेतलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रंसगी ते बोलत होते.
पुढे बोलतान गायकवाड म्हणाले मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ , सारथी सारख्या संस्थे मधून बिगर व्याजी अर्थसाह्य केले जाते. यामुळे मराठा समाजातील तरुणांनी पारंपारिक शेती बरोबरच उदोग व्यवसाय उभे करावेत असे मत गायकवाड यांनी मांडले. मराठा समाजातील मुलांनी अखिल भारतीय मराठा महासंघात सामील होऊन गाव शाखा सुरु कराव्यात .
यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्याक्ष नाथाभाऊ शेवाळे,जिल्हा उपाध्यक्ष वर्षा काळे ,गणेश शिंदे,अविनाश जाधव,तालुकाध्यक्ष उर्मिला फलके,डॉ.नामदेव नरवडे प्रभाकर थेऊरकर,बाबुराव पाचंगे,प्रा.सतीश धुमाळ,संभाजी कर्डीले,शशिकला काळे,राणी कर्डीले,ज्योती कर्डीले,अर्चना डफळ,जयश्री थेऊरकर,उमेश शेळके,संजीवणी दसगुडे,पल्लवी वर्पे,राहुल शिंदे,भारती बारवकर, मनीषा तरटे सह पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थी गुणगौरव प्रसंगी पालक मोठ्या संखेने उपस्थीत होते वयोगट ५ ते १० १)अर्णवी सोमनाथ मारणे(प्रथम) २)तनवी साके(द्वितीय) ३)समीक्षा स्वामी (तृतीय) ४) श्रेया सातपुते(उत्तेजनार्थ)
वयोगट ११ ते १६ १. जान्हवी भागवत घुले (प्रथम) २)शर्वरी नीचित (द्वितीय) ३)आरती समीर मोरे (तृतीय) ४)संचीता वाळुंज (उत्तेजनार्थ)
खुला गट – १) सोनाली राईबोले (प्रथम) २)प्रियंका मारणे (द्वितीय) ३)प्रणव ढवण (तृतीय)
मुले – १) आदित्य शेळके (प्रथम) २) सार्थक ओव्हाळ (द्वितीय) ३)शिवराज ठोकळ (तृतीय)
रांगोळी- १)प्रतिभा इथापे(प्रथम) २)राणी बनकर(द्वितीय) ३)जोगेश्वरी बावरकर (तृतीय) ४)पूनम खर्चे.(उत्तेजनार्थ) ५) प्रमिला क्षीरसागर(उत्तेजनार्थ)
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामकांत वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले तर शहराध्यक्षा साधना शितोळे यांनी आभार मानले.
COMMENTS