पुणे (प्रतिनिधी ) - महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुमारे दहा हजार 950 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी भाजपचे ...
पुणे (प्रतिनिधी ) - महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुमारे दहा हजार 950 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला.
मविआ चे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 73194 मते मिळाली तर भाजपा चे उमेदवार हेमंत रासने यांना 62244 मते मिळाली या पराभवाचा भाजपा ला मोठा धक्का बसला असल्याचे मानला जात आहे.
भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक मोठी चुरशीची झाली. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे प्रतीदावे करण्यात येत होते. मात्र भाजपाला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
रवींद्र धंगेकर हे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जनजमानसात ओळख होती. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात होतो. त्यांचा विजय होणार आहे असा कार्यकर्त्यांना विश्वास होता. या निवडणुकितील विजयामुळे मविआ ची ताकत वाढल्याचे दिसून आले.
COMMENTS