शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात मोठ्याप्रमाणात भ्रस्टाचार होत आहे.नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवून पैसा वसुल...
शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात मोठ्याप्रमाणात भ्रस्टाचार होत आहे.नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवून पैसा वसुल करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अविनाश घोगरे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विभाग आहे. रेशन कार्ड काढणे, दुबार रेशनकार्ड कार्ड साठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात.पुरवठा विभागातील कर्मचारी नागरिकांकडून आर्थिक लूट करत असल्याचे अनेक तक्रारी आल्या तरी देखील कारवाई होताना दिसत नाही.
कोरोना महामारीने आर्थिक संकट मोठे आहे. केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांना आधार देत मोफत धान्य देत आहे. मात्र त्यासाठी रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करावे लागते.याचा गैर फायदा पुरवठा विभागातील कर्मचारी व खासगी व्यक्ती घेत असल्याचा आरोप अविनाश घोगरे यांनी केला.
नागरिकांची लूट करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
COMMENTS