कार्यकर्त्यांची मोट बांधून सर्व निवडणुका लढविणार - पै. मंगलदास बांदल शिरूर ( प्रतिनिधी ) - स्थानिक स्वराज्य संस्था सह सर्व निवडणुका लढवि...
कार्यकर्त्यांची मोट बांधून सर्व निवडणुका लढविणार - पै. मंगलदास बांदल
शिरूर ( प्रतिनिधी ) - स्थानिक स्वराज्य संस्था सह सर्व निवडणुका लढविणार असल्याचे जि प बांधकाम समितीचे माजी सभापती पै मंगलदास बांदल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कारागृहातून जामिनावर सुटताच मंगलदास बांदल हे राजकारणात सक्रिय झाले. मी कारागृहात गेल्याने निवडणूका ह्या एकतर्फी झाल्या. विरोधकांवर पोलीस प्रशासनाचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. सध्या राजकारणाची खालची पातळी गाठली आहे. फक्त मला राजकारणातून संपविण्यासाठीच पोलीस निरीक्षक इथे आणले होते.
ते पुढे म्हणाले की तुम्ही दिसता एक वागता एक करता एक ही वृत्ती चांगली नाही अशी टीका आ अशोक पवार यांच्यावर नाव न घेता केली. ही वृत्ती थांबली पाहिजे. बांदल साठी वेळ देता मात्र तो वेळ सर्वसामान्यांसाठी दिला असता तर कार्यकर्ते जोडले असते.
संकटे मला नवीन नाहीत मी लाल मातीतलाच पैलवान आहे. पाठीत काय वार करता ,हिंमत असेल तर समोरून करा असा इशारा यावेळी दिला. पारदर्शक कारभार करता अशा बढाया तुम्ही मारता मग आपल्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आली कुठून असा सवाल त्यांनी यावेळी केला.
मी कारागृहात गेलो तेथे अनेक पुस्तके वाचली, तिथली परिस्थिती जवळून पाहिली, भरपूर व्यायाम केला आणि मला असलेळी शुगरच नाहीशी झाली. मग मला कारागृहात पाठवून फायदा कोणाचा झाला सवाल त्यांनी केला. मला कारागृहात पाठविणाऱ्याचे मी आभारी आहे.
आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देत ते म्हणाले की आता रडायचे नाही तर लढायचे आहे. ही वेळ थांबण्याची नाही तर लढण्याची आहे. राजकारणात आता माघार घेणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी युवा नेते निखील बांदल,ऍड आदित्य सासवडे, पोलीस पाटील, किरण काळे, बाबू पाटील ढमढेरे, नीलेश ओस्तवाल, नीलेश मयूर ओस्तवाल, खरबस, गणेश वाळके, अनिकेत गायकवाड, दीपक मगर, कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS