शिर्डी ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आणि एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले. हा बदल होताच प्रशासनातही प्रचंड बदल होऊन...
शिर्डी ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आणि एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले. हा बदल होताच प्रशासनातही प्रचंड बदल होऊन शासनाच्या कामाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रशासनातील प्रदिर्घ अनुभवामुळे त्यांची सर्व स्तरातील अधिकाऱ्यावर पकड आहे. त्यामुळे राज्यकारभार गतीने हाकला जात आहे. राज्य सरकारचा कारभार हा आता सर्वसामान्य जनतेच्या मनाप्रमाणे सुरू झाला असल्याची भावना समाजाची बनली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे सर्वसामान्यांना आपला मुख्यमंत्री वाटतात. असे प्रतिपादन खा. सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी शिर्डी येथे मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये व्यक्त केले.
येत्या नऊ तारखेला येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस साजरा करताना, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना आवडणाऱ्या आरोग्याशी संबंधित विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. अनेक प्रकारचे आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम राबवित साजरा करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ या. कारण मुख्यमंत्री हे राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या बाबतीत खूपच संवेदनशील आहे. ते सतत आरोग्य खात्याच्या मार्फत राज्यातील जनतेला, विशेषतः ग्रामीण भागातील अगदी वाडी, वस्ती, तांडा, पाडा, दुर्गम भागातीलही नागरिकांना आरोग्याच्या अधिक सुविधा कशा प्रदान करता येतील यावर त्यांचा भर असतो. कारण कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे आरोग्य बिघडले तर संपूर्ण कुटुंब व्यवस्था ढिली पडते. अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देता देता संपूर्ण कुटुंब अनेक स्तरांवर उध्वस्त होते. तेव्हा त्यांचे आरोग्य विभागावर विशेष लक्ष आहे.
अशाप्रकारे आरोग्याशी संबंधित सामाजिक उपक्रम राबित आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देऊ या. असे मार्गदर्शन खा. सदाशिवराव लोखंडे यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.
प्रारंभी जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी खा.सदाशिवराव लोखंडे यांचा चालू असलेल्या विकास कामांचा धडाका, त्यातून मतदार संघातील नागरिकांमध्ये आलेलं चैतन्य. खासदार साहेबांशी जनतेशी वाढलेली जवळीक. त्यातून खासदारांना आशिर्वाद, धन्यवाद, व शुभेच्छा भेटीसाठी लागलेली जनतेची रिघ, कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेशासाठी येत असलेले लोंढे हे आपल्या पक्षांचं वाढलेलं बळ आहे. असा पक्षाचा मतदार संघातील वाढलेल्या आलेख निदर्शनास आणून दिला. पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वास दिला, प्रोत्साहन दिले. व आता आपल्याला विरोधक राहीले नाही. आपली स्पर्धा ही आपल्याशीच आहे. पक्षाचे काम, विचार सर्व प्रकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यानी पक्ष बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे साहेब याच्या वाढदिवसापासून गावोगावी शाखेचे फलक लावले पाहिजेत, तसेच जास्तीत जास्त नवीन सभासद नोंदणी करून पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे,तसेच मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गावोगावी आरोग्य शिबीर घेण्यात यावे अशी सूचना देवकर यानी पदाधिकाऱ्यांना केली आहे.
या मिटिंगसाठी बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, बाजीराव दराडे, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ विमल पुंडे,सौ कावेरीताई नवले,युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, महेश देशमुख, अध्यात्मिक अघाडीचे जिल्हाप्रमुख संपतराव जाधव, उपजिल्हाप्रमुख जयंतराव पवार, आण्णासाहेब म्हसे,भाऊसाहेब गगावणे,एकनाथ यादव,राजेश ताबे,ज्ञानेश्वर गुलदगड, मनील नरोडे,तालुकाप्रमुख रमेश काळे, देवेंद्र लांबे, राजेश सोनवणे, रावसाहेब थोरात,सुरेश डिके, संजय वाकचौरे, बापूसाहेब शेरकर, सुनिल कराळे,
शहर प्रमुख बाबा कांगुणे, सुधीर वायखिंडे, सदाशिव गोदकर,सागर बोठे,गणेश कानवडे,अक्षय जाधव,राजेंद्र शेळके, सुनील बारहाते, जयराम कादळकर, चद्रकांत गायकवाड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शाम गोसावी, सौ पूनमताई जाधव, सौ मिराताई गुजाळ सौ वैशाली टरेताई याच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS