शिरूर (प्रतिनिधी ) शिरूर तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष व मासे व्यवसायकाला जीवे मारण्याची धमकी देऊन, कट...
शिरूर (प्रतिनिधी )
शिरूर तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष व मासे व्यवसायकाला जीवे मारण्याची धमकी देऊन, कट रचून मासे व्यवसायात पार्टनर व खंडणी मागितल्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे ६ जणानावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे.
समशुद्दीन वीराणी (रा. कल्याणी नगर पुणे जिल्हा पुणे),सनी यादव (रा.वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
दौलत उर्फ नाना उमाजी शितोळे (वय 46 वर्ष व्यवसाय शेती व मासे विक्री रा. मूळ राहणार शिंदोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे हल्ली राहणार फक्त रेसिडेन्सी टावर 4 रूम नंबर 507 वडगाव शेरी पुणे)
यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
समशुद्दीन वीराणी (रा. कल्याणी नगर पुणे जिल्हा पुणे),
पप्पू उकिरडे (रा. सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे) सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (रा. धनकवडी पुणे जिल्हा पुणे ),केतन मल्लाव (रा.शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे ) सनी यादव (रा.वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे), अनोळखी एक इसम या
सहा जनांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ,यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
हा गुन्हा 5 फेब्रुवारी रात्री पावणे अकरा वाजता घडला असून, दिनांक 9 फेब्रुवारी रात्री पावणे एक वाजता दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक ५ फेब्रुवारी २३ रात्री २२ वाजून ४२ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या शिदोंडी ता. शिरूर येथे फिर्यादी राहते घरी असताना त्यांच्या मासे व्यवसायात पार्टनर देण्याबाबत तसेच जीवे मारण्याची धमकी देउन समशुद्दीन विराणी याने फिर्यदीचे ४० लाख रूपये न देता खंडणी स्वरूपात स्वताकडे ठेवुन घेतले व तो व्यवसाय सोडण्यास भाग पाडले , हा सर्व प्रकारात पप्पु उकीरडे व सचिन उर्फ पप्पु दत्तात्रय घोलप हे मदत करीत असल्यामुळे त्या सर्वानी मिळून माझे विरोधात कट करून फिर्यादिचे मोबाईल नंबर ९८८१९०११११ यावर केतन मल्लाव रा. शिरूर याने मोबाइल नंबर ९९६०१७३९०७ या नंबर वरून व्हॉटसअपव्दारे कॉल करून त्याव्दारे कॉन्फरस वर घेउन सनी यादव (रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे) व एक अनोळखी याने त्यांचे करवी महेंद्र मल्लाव यांचा केलेल्या निर्घुण खुनाचा संदर्भ देऊन जिवे मारण्याची धमकी देऊन माझे मासे पकडण्याचे कॉन्ट्रॅक्टमध्ये ५० टक्क्यांचा पार्टनर होण्याकरीता अप्रत्यक्षपणे ३ लाख रूपये खंडणीची मागणी करून शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे खंडणी, कट रचणे, जीवे मारण्याची धमकी असे गुन्हा दाखल करण्यात आला असून , पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत हे करीत आहे
COMMENTS