शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) लोणी काळभोर पश्चिम बंगाल येथे ४१व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या कुमार स...
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
लोणी काळभोर पश्चिम बंगाल येथे ४१व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या कुमार संघात लोणी स्पोर्ट्स क्लब मधील चेतन बिका यांस सुवर्ण पदक प्राप्त झाल्या बद्दल..
तसेच १८वर्षीय ५ वी खेलो इंडिया
स्पर्धेसाठी मध्य प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघा मध्ये निवड तसेच तेजस जाधव, गोविंद खलसे यांची राज्यस्तरीय स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त झाल्या बद्दल ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे जाहीर सत्कार वाहतूक शाखा पोलीस प्रमुख लोणी काळभोर मा.श्री.अशोक तोरमडल साहेब तसेच पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल प्राचार्य मा. सिताराम गवळी सर ,ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप , कुस्तीगीर पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य चे दिलीप शेवाळे च्या शुभहस्ते करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागीय खो खो स्पर्धा दिनांक १\१\२३ रोजी सोलापूर येथे झालेल्या खों खो स्पर्धमध्ये पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल लोणी काळभोरच्या १७वर्षीय गटामध्ये प्रथम क्रमाक पटकावला व पुढील राज्यस्तरीय होणाऱ्या स्पर्धसाठी संघाची निवड झाल्या बद्दल ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप यांनी खेळाडू चे अभिनंदन केले.
COMMENTS