शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन) लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील लोणी काळभोरमधील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया...
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन)
लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील लोणी काळभोरमधील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धाच उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या वेळी गवळी सर म्हणाले लहान वयात शरीर लवचिक असतं आणि नवनवीन गोष्टी करून बघण्याचा उत्साह असतो. या वयात एखाद्या क्रीडाप्रकाराची मुलांना ओळख करून दिली तर ती त्यांच्या आरोग्यदायी आयुष्याची एक गुरुकिल्लीच ठरेल.चांगल्या सवयी या लहान वयातच लागतात. त्यामुळे मजा म्हणून खेळाचा आनंद घेत असतानाच मुलांना खेळाचे नियमही बारकाईनं समजावून द्यायला हवेत. क्रीडा क्षेत्रातल्या स्पर्धात्मक जगताशी ओळख करून देत असतानाच खेळाची गोडी लावायला हवी. मुलांनी खेळावर मनापासून प्रेम केलं तर मग पुढे हार-जित स्वीकारणं त्यांना सोपं जाईल.कुठलाही खेळ खेळल्यामुळे अवयवांचा अंतर्गत समन्वय अधिक जलद गतीनं साधला जातो. प्रत्येक क्रीडाप्रकाराचं एक वेगळेपण असलं तरी कौशल्यांचे काही धागे समान असतात. मैदानी खेळांमुळे मातीशी एक नातं निर्माण होतं. तर सांघिक खेळ संघभावना दृढ करतात. बुद्धीचा कस पाहणाऱ्या बैठ्या खेळांमुळे एकाग्रता वाढते आणि विचारांचा दृष्टिकोन रुंदावतो.सर्वतोपरी फिट क्रीडाप्रकार शरीराला नियमित व्यायामाची सवय लावतात आणि शरीराला एक वळण लागतं. धावणं, जॉगिंग करणं, दोरीवरच्या उड्या मारणं, पोहणं मुलांची तग धरून राहण्याची क्षमता वाढवतात. तर क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो यासारखे अनेक खेळ एक आनंददायी अनुभव देतात. असे प्रतिपादन गवळी सर यांनी केले. या वेळी पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल मुख्याध्यापक एस.एम.गवळी सर ,पर्यवेक्षक शिदे
सर ,क्रिडा शिक्षक कोरे सर,जानराव सर,पिरजादे सर,शेडगे सर,बोरकर मॅडम, बिरूदेव भास्कर उपस्थित होते.
COMMENTS