शिरुर (प्रतिनिधी)- शिरुर शहरातील सुभाष चौकातील काही बांधकामे ही नगरपरिषदेने दिलेल्या परवानगी नुसार नसून जुन्या जोत्याप्रमाणे म्हणजेच नगर...
शिरुर (प्रतिनिधी)-
शिरुर शहरातील सुभाष चौकातील काही बांधकामे ही नगरपरिषदेने दिलेल्या परवानगी नुसार नसून जुन्या जोत्याप्रमाणे म्हणजेच नगर परिषदेच्या डिमांड रजिस्टर ला असलेल्या नोंदीप्रमाणे आहेत.
तसेच सदर ठिकाणी दर्शनी भागात मुख्य रस्ता असून मागील बाजूस सरकारी बोळ आहे.त्यामुळे बऱ्याच इमारतींना समोरून गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी जास्त करून सराफ दुकाने आहेत.
वास्तविक पहाता जी बांधकाम आता चालू आहेत त्याच्या चौकशी होण्याबरोबर जीवन कामे पूर्ण झालेली आहेत ती दिलेल्या बांधकाम परवानगी प्रमाणे झालेली आहेत का हे पाहणं जास्त गरजेचे आहे कारण काही इमारती बांधकाम परवानगी पेक्षा उंच बांधलेल्या दिसत आहेत व ते इमारत मालक रोडवर जा-ये करणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी देखील खेळत आहेत शिरुर शहरातील कै. शांतीलालजी कोठारी व त्याच्या वारसांनी सि. स.नं.321 मध्ये नगर परिषदेने दिलेल्या बांधकाम परवानगी पेक्षा खूप मोठया प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केलेले असून ते बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा देखील अर्ज असताना ,नगरपालिका परत ते अमलात का आणत नाही?.तसेच शिरुर च्या बस स्टॅण्ड पासून सुभाष चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या सर्व जागा मालकांनी मुख्य रस्त्याच्या बाजूंनी खूप मोठया प्रमाणात गॅलरी बाहेर काढून रस्त्यावर येणारा नैसर्गिक हवा आणि प्रकाश बंद केलेला असल्याचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का येत नाही ? व आले असेल तर त्यांनी आतापर्यंत कोणती ही कायदेशीर कारवाई का केली नाही याचा याचा खुलासा होणे आवश्यक आहे.तसेच शिरुर शहरातील गेल्या 10 वर्षात झालेले नवीन बांधकामाचा सर्व्हे करून ते बांधकाम परवानगी नुसार आहे किंवा नाही याची चौकशी होणे आवश्यक आहे.तसेच सदर बांधकामे नियमानुसार केलेले नसून देखील त्यांना कंपलिशन सर्टिफिकेट दिलेले असेल तर संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधित बांधकामे पाडून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे शिरुर शहरातील नागरिक करत असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
COMMENTS