शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) लोणावळा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणावळा निवडणूक बिनविरोध करण्यात सभासदांना यश मिळाले. सदर...
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
लोणावळा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणावळा निवडणूक बिनविरोध करण्यात सभासदांना यश मिळाले. सदर शालेय कर्मचारी पतसंस्था लोणावळा परिसरातील शाळेतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यासाठी श्री.भगवान आंबेकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून स्थापन केलेली आहे.
पतसंस्थेतर्फे सभासदांना उच्चशिक्षण, घर खरेदी, वाहन खरेदी, लग्न समारंभ, आजारपण अशा विविध कारणासाठी अल्पमुदतीचे तातडी कर्ज आणि दीर्घ मदतीचे कर्ज असे दोन प्रकारचे कर्ज कमी व्याज दारामध्ये उपलब्ध करून दिले जाते.
दर पाच वर्षांनी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संचालकाची निवड केली जाते. निवडणूक खर्च टाळण्यासाठी सर्व सभासद मिळून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आले. परंतु यावर्षी संचालकांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे होईल असे चिन्ह दिसत असताना संस्थेचे जेष्ठ सभासद विठ्ठल खेडकर, कुंडलिक आंबेकर, महेश चोणगे आणि सर्व सभासदांनी प्रयत्न करून निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळाले.
नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालक निवड निवडणूक निर्णय अधिकारी सहकारी संस्था, उपनिबंधक वडगाव मावळ चे श्री. आर.के.निखारे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये विठ्ठल खेडकर(अध्यक्ष), महेश चोणगे(उपाध्यक्ष), योगेश कोठावदे(खजिनदार), प्रकाश पाटील (सचिव), संचालकामध्ये आदिनाथ दहिफळे, श्रीनिवास गजेंद्रगडकर, रवी दंडगव्हाळ, संतोष ठाकूर, मनोहर भोसले, महिला संचालकपदी मंजुश्री इकारी आणि सायली आपटे यांची निवड झाली.
नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकाचे लोणावळ्यातील विविध शाळेंमधून अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले.
COMMENTS