लातूर,(प्रतिनिधी ) लातूर येथील सुप्रसिध्द कवी संजय घाडगे यांची नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्...
लातूर,(प्रतिनिधी ) लातूर येथील सुप्रसिध्द कवी संजय घाडगे यांची नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी घाडगे यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान केले आहे.
साहित्यिकांना एक वैचारिक प्रगल्भ विचारपीठ निर्माण करुन देण्यासाठी निर्माण झालेल्या अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेची स्थापना वणी,जि.यवतमाळ येथे झाली आहे, या परिषदेच्या राष्ट्रीय संघटक पदी प्रसिध्द कवी संजय घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध उपक्रम कवी संमेलन,साहित्य संमेलन आयोजित करुन नवोदितांना प्रोत्साहीत करावे असे घाडगे यांच्या या नियुक्तीपत्रात नमुद करण्यात आले आहे. संजय घाडगे यांचे वणवा,अंधाराला डोळे फुटता,निळ्या आभाळाचे गाणे हे काव्यसंग्रह प्रकाशित असून,त्यांच्या कविता विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाला आहेत,वादळ चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे.अनेक साहित्यसंमेलन,आकाशवाणीवर त्यांचे काव्यवाचन झाले असून, निखार्यावरचे पाय कथासंग्रह, भिमायण काव्यसंग्रह, गाळपेरा कादंबरी, आयुष्यावर लिहू काही ललित आणि बागुलबुवा हा बालगीत संग्रह साहित्यसेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत, अस्वस्थ वर्तमानाच्या कविता काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे,त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
COMMENTS