शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) शिर्डी येथे ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त साई गुरूकुल इंग्लिश मिडीयम मध्ये ना भूतो ना भविष्य असा वर्कआउट...
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शिर्डी येथे ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त साई गुरूकुल इंग्लिश मिडीयम मध्ये ना भूतो ना भविष्य असा वर्कआउट शाळेतील सर्व मूलांनी व आलेल्या सर्व वेलनेस कोच. प्रमुख पाहुण्यांनी अध्यक्षांनी सादर केला. शाळेमध्ये मुलांना शिक्षणाबरोबर आरोग्य कसे योग्य ठेवायचे हे वर्कसाउटच्या माध्यमातून वर्षभरापासून शिकवले जात आहे. व त्यांचा प्रत्यक्ष प्रयोग ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दाखविण्यात आला. या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महागुरू. मा. श्री. जयंत गवारे सर (जागतिक आरोग्य सल्लागार व वेलनेस कोच] मा. श्री अवधुत धोकटे सर [जागतिक आरोग्य सल्लागार व वेलनेस कोच] मा. सौ. अनिता मते मॅडम (जागतिक आरोग्य सल्लागार व वेलनेस कोच) मा. सौ. वैशाली गोंदकर मॅडम (जागतिक आरोग्य सल्लागार) तसेच मा. चौधरी सर (वेलनेस कोच) मा जोंधळे सर ( वेलनेस कोच) मा. अनिल त्रिभुवन सर (ग्रेट वेलनेस कोच) मा. शिंदे सर (वेलनेस कोच) उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणातून मुलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेतील मुलांचे व शाळेचे भरभरून कौतुक केले व आपल्या चिमुकल्यांचे वर्कआउट पाहण्यासाठी सर्व पालकांनी उपस्थिती लावली. वर्षभरातील स्पर्धा- मधील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांचे बक्षिस पाहुण्यांच्या हस्ते मुलांना देण्यात आले. कार्यक्रम
यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे चेअरमन मा. श्री तान्हाजी वामनराव गोंदकर सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सौ. कांचन तान्हाजी गोंदकर मॅडम ( साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल, शिर्डी उपाध्यक्षा, वेलनेस कोच सुपरवायझर) तसेच शाळेच्या सचिव व प्राचार्या मा. सौ. मंगला कुन्हे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. काळे रूपाली मॅडम यांनी केले. तसेच शाळेतील सहशिक्षक सौ. शर्मा मॅडम, सौ. राठोड मॅडम, दिघे मॅडम सपकाळ मॅडम, कुमावत मॅडम, अवचर मॅडम, मेशराम कर मॅडम, 'कुमावत मॅडम मदन मोहन सर, खिल्लारी सर, गमे सर, वाघ मामा, वाघ मावशी या सर्वांचे सहकार्य लाभले व सौ. चौधरी मॅडम यांनी आलेल्या पाहुण्यांचे, पालकांचे, मुलांचे सर्वाचे आभार मानले.
COMMENTS