शिरूर (प्रतिनिधी ) - पत्रकार फक्त लेखणीपुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम राबवत आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सामाजिक उपक्रम राबवुन...
शिरूर (प्रतिनिधी ) -
पत्रकार फक्त लेखणीपुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम राबवत आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सामाजिक उपक्रम राबवुन समाज उपयोगी कामे करत असल्याने हे खुप कौतुकास्पद असल्याचे शिरूरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ म्हणाले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूरच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शिरुरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन येथील गोकुळ वृध्दाश्रमात अन्न-धान्य,किराणा व फळांचे वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी तहसिलदार प्रशांत पिसाळ बोलत होते.
वृध्दाश्रमात सामाजिक उपक्रम घेत पत्रकारांनी येथील वृध्दांसमवेत उत्साहात पत्रकार दिन साजरा केला.विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे हे पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हाणाले.
यावेळी शिरूरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अर्जुन बढे, शहराध्यक्ष बबन वाघमारे, सचिव भाऊसाहेब खपके, उपाध्यक्ष सुनील पिंगळे,योगेश भाकरे,प्रसिध्दी प्रमुख आकाश भोरडे, पत्रकार रविंद्र खुडे भगवान श्रीमंदिलकर शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव शिवसेनेचे युवा नेते स्वप्निल रेड्डी,अविनाश घोगरे, वृक्षमित्र तुषार वेताळ, सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे,गोकुळ मुथा कांचन मुथा धन्यकुमार मुथा आसराज मुथा पारस मुथा यांसह मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS