कराड ( प्रतिनिधी ) - दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी माध्यमिक विद्यालय बेलवडे हवेली ता. कराड या विद्यालयामध्ये सन 1999-2000 च्या दहावीच्या विद्...
कराड ( प्रतिनिधी )- दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी माध्यमिक विद्यालय बेलवडे हवेली ता. कराड या विद्यालयामध्ये सन 1999-2000 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांचे हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्वांनी सामूहिक प्रार्थना म्हटली. त्यानंतर सहकारी मित्र कैलासवासी अमोल लोहार यास सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सुमारे 23 वर्षांनी एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी मोठा आनंद व्यक्त केला. भारावलेले माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव माननीय एन. वाय.पवार यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासून आज अखेरच्या विविध आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संवाद साधत एकमेकांचे सुखदुःख सर्वांसमोर व्यक्त केले तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस एक एलईडी टीव्ही भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी हनुमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एन वाय पवार,मुख्याध्यापक डी. डी.माने, उपशिक्षक एस.एस.निकम, एन. एम. अर्जुगडे, एस. एल. गोसावी, ए. के. सावंत,एस.एस.साळुंखे, एम.एस.पवार, एस. व्ही. शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी एल.एस.जाधव, बी.डी. पाडळे, एच. व्ही. शिंदे, इ.एस. खराडे आणि दहावीचे माजी सर्व विद्यार्थी सहभागी उपस्थित होते .
COMMENTS