पिंपळे गुरव,(प्रतिनिधी )- ३ जानेवारी रोजी सकाळी आमदार लक्ष्मण जगताप यांची निधनाची बातमी कळताच पिंपळे गुरव,नवी सांगवी येथील सर्व व्यापारी व...
पिंपळे गुरव,(प्रतिनिधी )-
३ जानेवारी रोजी सकाळी आमदार लक्ष्मण जगताप यांची निधनाची बातमी कळताच पिंपळे गुरव,नवी सांगवी येथील सर्व व्यापारी व साई चौक येथील भाजी विक्रेत्यांनी स्वतःचे दुकाने कडकडीत बंद ठेवून भांऊन विषयी असलेले प्रेम आणि कृतज्ञता दाखवली आणि दुपारी सर्व व्यापारी आणि भाजी विक्रेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी त्यांच्या दर्शनासाठी पोहोचले.
त्याप्रसंगी भाजी मंडईचे अध्यक्ष संजय मराठे यांनी स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून म्हणाले की दोन वर्षापूर्वी 1 जानेवारी रोजी भाऊंनी भाजी विक्रेते रस्त्यावर थांबल्या नंतर होणारी अतिक्रमणाची कारवाई,भाजी विक्रेत्यांना जागेचा अभाव अशा अनेक समस्या जाणून घेऊन 1 जानेवारी रोजी साई चौक येथे भाजी विक्रेतांना जागा उपलब्ध करून दिले.त्यांच्या या कर्तव्यदक्ष कामामुळे आज साई चौक भाजी मंडई येथे तब्बल 126 भाजी विक्रेते आनंदाने भाजी विकून आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरीत आहेत.भाऊंनी केलेले हे उपकार भाजी विक्रेते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत.
त्यावेळी भाजी मंडईचे अध्यक्ष संजय मराठे,उपाध्यक्ष अनिल कांबळे,कुणाल धिवार,रमेश डफळ,बबन डफळ,गणेश मते,नवीद खान,अंकुश आपेट,बळीराम भोंगे,बळी बिरादार,निलेश बडगुजर,नितीन दोधाड,नरसिंग यादव,सुनील सावंत,अण्णा नायडू,गणेश पैठणे,रामजी आगलावे आधी भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS