शिरूर (प्रतिनिधी) शिरूर बस स्थानक बी ओ टी बांधकाम आराखड्याप्रमाणे नसून प्रमाणापेक्षा जास्त बांधकाम केले असून या बांधकामाची बांधकाम परवानगी...
शिरूर (प्रतिनिधी)
शिरूर बस स्थानक बी ओ टी बांधकाम आराखड्याप्रमाणे नसून प्रमाणापेक्षा जास्त बांधकाम केले असून या बांधकामाची बांधकाम परवानगी रद्द करावी अन्यथा दहा जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
या वेळी अल्पसंख्यांक महिला सहप्रदेशाध्यक्ष रेशमा शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष राजु शेख, शिरुर तालुका संपर्क प्रमुख बाबुराव पाचंगे शिरुर भाजपा सरचिटणीस विजय नर्के, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष प्रमोद जोशी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष हुसेन शहा, अनुसूचीत आघाडी अध्यक्ष कौस्तुभ उबाळे, महिला मोर्चा सरचिटणीस अनघा पाठकजी, पुजा चोंधे, हर्षाचा संघवी इ.पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी पाचंगे यानी सांगितले कि शासनाने शिरूर बस स्थानक बीओटी मंजूर केले आहे त्याप्रमाणे या बस स्थानकांचे काम सुरू आहे या बांधकामात सिटी सर्वे नंबर ११३८ व ११३९ मधील आगार व उपकामे यासाठी १७९५ चौरस मीटर, बस स्थानक १४०० चौरस मीटर, कर्मचारी निवासस्थानासाठी 740 चौरस मीटर, असे एकूण ३९३५ चौरस मीटर तर व्यापारी संकुलास ६ हजार चौरस मीटर, त्यात तळमजला 2300 चौरस मीटर व पहिला मजला तीन हजार सातशे चौरस मीटर याप्रमाणे बांधकाम करण्यात खाजगी उद्योजकास परवानगी देण्यात आली आहे.
नगरपरिषदेने ही दिनांक 17 जून 2020 रोजी रहिवासी ३८४६ चौरस मीटर व वाणिज्य ५५९५ चौरस मीटर इतक्या बांधकामात परवानगी दिली आहे.
परंतु खाजगी उद्योजकाने व्यापारी संकुल स्थळ मधला 2300 चौरस मीटर व पहिला मजला 3700 चौरस मीटर पेक्षा जास्त बांधकाम करण्यात येत आहे. तर प्रवेशद्वार बाहेर जाण्याचा मार्ग सिटी सर्वे नंबर 1129 यावरही बांधकाम सुरू करण्याची तयारी या खाजगी उद्योजकाने चालवली आहे. व तेथेच बसस्थानकाचे कार्यालय बांधले आहे. यामुळे 17 जून 2020 च्या नगरपरिषद शिरूर यांनी दिलेल्या बांधकाम परवानगीचे खाजगी ठेकेदाराने राज्य परिवहन महामंडळाने उल्लंघन केलेले दिसून येत आहे. तिसऱ्या मजल्याचे ही काही ठिकाणी बांधकाम केले आहे.
जर या उद्योजकास नगर परिषदेने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला तपासणी करून दिला असेल तर त्याची माहिती द्यावी शिरूर बस स्थानकाचे हे काम खाजगी व्यावसायिकाने परिवहन महामंडळाच्या साथीने अवैद्यरित्या केले असून मोठ्या प्रमाणात शासनाची जागा बळकवली असल्याचा आरोपही भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी करून या बांधकामाची परवानगी रद्द न केल्यास 10 जानेवारी पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
COMMENTS