शिरुर (प्रतिनिधी ) - शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे दि.10 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोज...
शिरुर (प्रतिनिधी ) - शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे दि.10 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .पुणे येथील यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेत 35 विद्यार्थी व 40 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला या शिबिरामध्ये पहाटेचा व्यायाम, चहा नाष्टा, दुपारी जेवण व रात्रीचे जेवण याबरोबर समाज
प्रबोधनपर कार्यक्रम तसेच गावातून फेरी व्याख्यान व सरदवाडी गाव प्लास्टिक मुक्त अभियान, तसेच सरदवाडी गावातील भैरवनाथ मंदिर व स्मशानभूमी स्वच्छता, अभिनव विद्यालय सरदवाडी येथील शाळेला भेट देऊन अंगणवाडीतील मुलांना शिकवणे, सरदवाडी येथील शेतीला भेट देऊन शेवग्याच्या झाडाला आळे करून गवत काढणे वगैरे माहिती देण्यात आली.
प्रबोधनपर कार्यक्रम तसेच गावातून फेरी व्याख्यान व सरदवाडी गाव प्लास्टिक मुक्त अभियान, तसेच सरदवाडी गावातील भैरवनाथ मंदिर व स्मशानभूमी स्वच्छता, अभिनव विद्यालय सरदवाडी येथील शाळेला भेट देऊन अंगणवाडीतील मुलांना शिकवणे, सरदवाडी येथील शेतीला भेट देऊन शेवग्याच्या झाडाला आळे करून गवत काढणे वगैरे माहिती देण्यात आली.
शिरूर शहरात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या सह्याद्री देवराई शिरूरला भेट देऊन तेथे वृक्षारोपण करत प्लास्टिक गोळा करून व गवत काढून स्वच्छता अभियान राबवले.सह्याद्री देवराई शिरूर टीम च्या वतीने महेबूब सय्यद, प्रा. सतिश धुमाळ यांनी सह्याद्री देवराई राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच सरदवाडी गावातील ग्रामस्थांचे दारूबंदी वर प्रबोधन करून गावातील स्वच्छता व पाण्याच्या स्रोताची स्वच्छता ही केली. शिरूर येथील नगरपालिकेला भेट दिली असता,
नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऍड प्रसाद बोरकर यांनी विधी शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना विधी शाखेतील अभ्यास क्रम पूर्ण करून अजून काय काय करू शकतो व कशा प्रकारे अभ्यास करावा, तसेच भविष्यात एक आदर्श नागरिक बनण्यासाठी स्वतःला कसे तयार करावे, याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कॕम्प यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य, डॉ. शुभदा घोलप यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्राध्यापक डॉ. वैशाली जाधव व प्राध्यापक मनोज वानरे सर व शिपाई संभाजी चिव्हे यांनी या शिबिरासाठी आपले योगदान दिले .तसेच सरदवाडी गावातील सरपंच ,उपसरपंच नागरिक व शिरूर शहरातील सह्याद्री देवराई येथील सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
COMMENTS