शिरुर (प्रतिनिधी ) - शिरुर तालुक्यातील पंचतारांकित रांजणगाव MIDC मधील पी.व्ही. सन्स कॉर्न मिलिंग कामगार संघटनेचे सर्व कामगाराच्या वतीने दि...
शिरुर (प्रतिनिधी ) - शिरुर तालुक्यातील पंचतारांकित रांजणगाव MIDC मधील पी.व्ही. सन्स कॉर्न मिलिंग कामगार संघटनेचे सर्व कामगाराच्या वतीने दि.01/09/2022] रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचे निवेदन दिले होते, त्यानंतर दिनांक 15/05/2022 रोजी प्रत्यक्ष काम बद आंदोलन सुरू झाले व गेले 90 दिवसापासून काम बंद आंदोलन चालू आहे. तरी अधिकृत संप काळात कायमस्वरूपी कामगारांच्या जागी कंत्राटी कामगार कामावर घेऊन कंपनी आपला मनमानी कारभार चालवत आहे. कायमस्वरूपी कामगारांच्या जागेवर नवीन कामगार घेऊन ,प्रामाणिकपणे गेली 10ते15वर्ष कंपनीत काम करणाऱ्या महिला व पुरुषांना शुल्क करणारे दाखवत निलंबित करत आहे .हा आपल्या वर होणारा अन्याय कंपनीतील कामगारांनी आपल्या वरिष्ठांना व कामगार आयुक्तांना सांगून मदतीची हाक घातली तरी कंपनीला फरक पडत नाही. अशा वेळेस अनेक प्रश्न निर्माण होतात की या सर्व गोष्टींना कोण शह देते?बेकायदेशीर रीत्या कंत्राटी कामगारांकडून काम करून घेत आहे. त्यावर आजपर्यंत अनेक बैठका व अनौपचारिक चर्चा देखील झाल्या. परंतु त्यामध्ये व्यवस्थापनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही व व्यवस्थापनाने अवास्तव दबाव तंत्राचा भाग म्हणून कामगारांवर खोट्या कारवाया सुरू केल्या आहेत तसेच 15/09/2022 पासून व्यवस्थापनाने नो वर्क नो पे नो अर्निंग च्या नावाखाली बेकायदेशीर पगार बंद केला. व आज पर्यंत पगार बंद आहेत त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे व त्यांचे जीवनमान देखील डासाळले आहे. तसेच दबावतंत्राचा भाग म्हणून व्यवस्थापनाने कंपनीमधील काही प्रॉपर्टी विकून टाकली आहे व काही पॉपर्टी स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात आहेत , हे करता करताहळू हळू पूर्ण कंपनी स्थलांतरित झाली तर ,हे वर्षानूवर्षे कामगार या वयात कुठे काम शोधणार व कोण कामावर घेणार.हा प्रश्न या सर्वांना पडला आहे शिवाय 10 ते15 वर्ष तूटपुंज्या पगारावर काम केले तर कंपनी आज छोटी छोटी करणारे दाखवत चौकशी लावून कामावरून काढत आहे शिवाय महागाई पाहता पगारवाढ ही नाही ? म्हणून
व्यवस्थापनाच्या ताठर भूमिकेचा निषेध म्हणून, संघटनेचे पदाधिकारी व सभासद 1. श्री नानाभाऊ काशिनाथ वाखारे 2 श्री पोपट शिवाजी बैलभर 3. सौ. कमल लिंबक खोसे 4. श्री. विजय केदार राजभर 5. श्री अमृत अर्जुन शिरसागर यांनी कंपनी समोर तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे विशेष म्हणजे या उपोषणाच्या ठिकाणी पोलीस यंत्रणा व वैद्यकीय सेवेचा पूर्णपणे अभाव दिसत आहे या कामगारांच्या जीविताला बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण?
COMMENTS