चेअरमन अशोक पवारांना सभासदच घरी बसवणार - सुधीर फराटे शिरुर (प्रतिनिधी ) - घोडगंगा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत आरोप -प्रत्...
चेअरमन अशोक पवारांना सभासदच घरी बसवणार - सुधीर फराटे
शिरुर (प्रतिनिधी ) -
घोडगंगा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत आरोप -प्रत्यरोपाच्या फेरीने प्रचार शिगेला पोहचला असुन वेळ व ठिकाण सांगा काय खरे काय खोटे हे सर्वांनाच कळू द्या आता चेअरमन अशोक पवारांना सभासदच घरी बसवणार असल्याचा विश्वास सुधीर फराटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आ.अशोक पवार यांनी आपल्या पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडत घोडगंगा कारखान्यावर 450 कोटीचे कर्ज़ सिद्ध करून दाखवा 'मी " राजकारण सोडून घरी बसेल", असे उत्तर होते. या पार्श्वभूमीवर आज दि 29 ऑक्टोबर रोजी घोडगंगा किसान क्रांती पॅनल च्या वतीने पत्रकार पारिषद घेऊन
दि. 6 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.त्या अनुषंगाने दि . 28/10/2022 रोजी घोडगंगा किसान क्रांती पॅनलने नारळ फोडत प्रचाराची सुरुवात मल्लिकार्जुन मंदिर न्हावरे येथून 3 वाजता करण्यात आली. आपला पॅनल निवडून आला तर आम्ही मतासाठी 3000 रु. न देता उसाला ३००० रुपये दराने भाव देवू , मयत झालेल्या सभासदांच्या वारसांच्य नोंद लावून त्यांना न्याय मिळवून देवू तसेच घोडगंगा कारखान्यावर असणारे 450 कोटीचे कर्ज हे कारखान्यावर असले तरी ते सभासंदावरच आहे .कारखाना कर्ज मुक्त करून सर्व सामान्य सभासंदाना न्याय मिळवून देनार असल्याचे आश्वासन प्रचाराच्या शुभारंभी सभेत घोडगंगा किसान क्रांती पॅनेलने घोषणा केली असता, सायकांळी ७ वाजता त्याच ठिकाणी आ.अशोक पवार यानी आपल्या पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडत घोडगंगा कारखान्यावर 450 कोटीचे कर्ज़ सिद्ध करून दाखवा 'मी " राजकारण सोडून घरी बसेल", असे उत्तर दिले.
त्याच अनुषंगाने दि. 29/10/2022 रोजी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलने पत्रकार परिषद घेत आम्ही हे फक्त तोंडी बोलत नाहीत तर कारखान्याच्या जो अहवाल प्रसिद्ध केला गेला आहे तोच हे सगळे कर्ज दाखवतो आहे व कारखाना का? व कशाप्रकारे कर्जात बुडत आहे ही माहिती सुधीर फराटे , दादा खळदकर व आबासाहेब सोनवणे यांनी दिली. आमचा वाद हा व्यक्तीशः नसून फक्त आ. अशोक पवार चेअरमन आहेत म्हणून आहे त्यांनी ठिकाण सांगावे आम्ही येतो, आमच्या फक्त 3 प्रश्नांची उत्तरे त्यांनी दयावीत,असे आव्हान घोडगंगा किसान क्रांती पॅनलने केले.
या पत्रकार परिषदेच्या वेळी सुधीर फराटे, इनामदार,भाजपा तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, काकासाहेब खळदकर, आत्मारामबापू फराटे, सचिन मचाले, राहुल पवार, अमोल महाजन, रवि लेंडे, राहुलदादा पाचर्णे, महबूब सय्यद,गोविंदतात्या फराटे,सरपंच सचिन शेलार, अनिलतात्या बाडे, संभाजी रणदिवे,धनराज पाचर्णे, बाबूराव पाचर्णे उपस्थित होते. यावेळी मनसे पुणे उप जिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी मनसेने घोडगंगा किसान क्रांती पैनल का पाठिंबा दिला याचा खुलासा करत घोडगंगेचे चेअरमन गेली 25 वर्षे सत्ता भोगत असूनही शेतकऱ्यांना उसाला योग्य बाजारभाव मिळत नाही, पण राज ठाकरेंच्या स्वप्नातील कल्पना आहे की प्रत्येक शेतक-याला उसाचा योग्य भाव मिळाला पाहिजे व शेतकऱ्यांने जिन्स पॅन्ट घातली पाहिजे आणि घोड घोडगंगा, किसान क्रांती पॅनलची भूमिका की आहे की 3000 रू. मताला नाही तर उसाला देवू म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना घोडगंगा किसान क्रांती पॅनलला पाठींबा देत आहे. यावेळी सर्वांचे आभार राहुलदादा पाचर्णे यांनी मानले.
COMMENTS