धुळे (प्रतिनिधी ) - पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील कुंभारवाड्यातील कुंभार समाजाच्या ६ कुटुंबाची घरे आगीच्या दुर्घटनेत बाधित होऊन प...
धुळे (प्रतिनिधी )- पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील कुंभारवाड्यातील कुंभार समाजाच्या ६ कुटुंबाची घरे आगीच्या दुर्घटनेत बाधित होऊन प्रचंड नुकसान झाले होते. या गंभीर घटनेची कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सतिश दरेकर यांनी दखल घेत शनिवार दि.30 ऑक्टोबर रोजी भेट घेतली.
पिंपळनेर ता. साक्री येथील समाज बांधवांना आधार देत बाधित कुटूंबियांचे सांत्वन करून त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सदर कुटुंबांना कपडे आणि आर्थिक स्वरूपात मदत कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली. तसेच पुढेही आवश्यक ती मदत करण्यात येईल असे आश्वासन संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सतिश दरेकर यांनी सांगितले.यावेळी संत गोरा कुंभार मंदिराच्या चालू असलेल्या बांधकामाचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेश अध्यक्ष, सतिशदादा दरेकर, धुळे जिल्हा कुंभार अध्यक्ष, सुरेश बहाळकर,सुरेश जगदाळे, अनिल चित्ते, साक्री तालुका अध्यक्ष, मोरे आणि पदाधिकारी तसेच प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव घोडनदिकर, विठ्ठलशेठ चव्हाण, नाशिक जिल्हा अध्यक्ष, सोमनाथ सोनवणे, गोकुळ सोनवणे, प्रदेश कोषाध्यक्ष, अनंत कुंभार, पा. आघाडी अध्यक्ष, प्रकाश भालेराव, उपाध्यक्ष बाळासाहेब कुंभार, आदि मान्यवर सामजिक बांधिलकी जपत उपस्थित होते.
COMMENTS