जिल्हाधिकारी यांच्या आदेशास कराची टोपली! बुरुडगाव येथे अनाधिकृत बांधकाम जोमात! अहमदनगर (प्रतिनिधी ) - बुरूडगाव ता. नगर य...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशास कराची टोपली! बुरुडगाव येथे अनाधिकृत बांधकाम जोमात!
अहमदनगर (प्रतिनिधी ) - बुरूडगाव ता. नगर येथील पाझर तलाव मध्ये शासनाने अधिग्रहण केलेल्या जमिनीचे अद्याप कमी जास्त पत्रक झाले नसून त्या 7/12 वर संबंधित शेतकऱ्याचे नाव असल्याने, शेतकरी त्या जागेवर नागरी वसाहत करून अनधिकृत बांधकाम करत आहेत.
यासाठी ग्रामपंचायत बुरूडगाव आणि माजी सैनिक संघटना यांनी जिल्हाधिकारी यांना अर्ज करून होत असलेले अनाधिकृत बांधकाम थांबवावे मागणी करण्यात आली आहे.आहे. दि.१९ ऑगस्ट 2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांना आदेश दिलेले असतानाही मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम होत आहेत.तसेच तलाव क्षेत्रात अनाधिकुत बांधकाम चालू असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात आज ग्रामपंचायतीने सदरील अनाधिकृत बांधकाम बंद करावे अशी नोटीस देण्यात आली .
जिल्हाधिकारी दिलेल्या आदेशावर कुठलीही कारवाही झालेली दिसत नाही . जिल्हाधिकारी यांच्या आदेशास केराची टोपली दाखवली जात आहे.1972 साली झालेल्या तलावावर अद्याप हि शासनाचे नाव लागलेले नाही .ज़िल्हा परिषद कुठलीही कारवाही करत नाही .त्याच प्रमाणे भूसंपादन ,भूमिअभिलेख सर्व डोळे झाकून बसलेले आहेत .याना कधी जाग येणार देव जाणे .
सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,सर्व आजी माजी सैनिक संघटना व, आदिवासी समाज्याचे जिल्हा अध्यक्ष राम चव्हाण व ग्रामस्थ ,ग्रामपंच्यात कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते .यानंतर हि सर्व काम बंद करून तलावाचे कमी जास्त पत्रक न झाल्यास सामूहिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
COMMENTS