स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सरपंचांचा होणार गौरव पुणे ( प्रतिनिधी ) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सरपंचांचा होणार गौरव
पुणे ( प्रतिनिधी ) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण भागाचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सरपंच, ग्रामसेवक यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला असुन या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सरपंच यांना "राजर्षी शाहू सरपंच रत्न तर ग्रामसेवक यांनां "राजर्षी शाहू ग्रामरत्न" पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील चार हजार ग्रामपंचायत पैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या पन्नास सरपंच आणि ग्रामसेवक यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या पुरस्कारा साठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कडून परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले होते. साधारणतः तीन हजाराच्या वर प्रस्ताव प्राप्त झाले असून यातील पन्नास उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच,ग्रामसेवक यांची निवड करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका गावचे कारभारी हे बजावत असतात. प्रस्तावामध्ये सरपंच, ग्रामसेवक यांनी केलेली कामे,महिला सबलीकरण आणि आर्थिक समीकरणासाठीचे कार्य, तालुक्यात केलेले विकास कामे, ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न, गावात कोणत्या समस्यांकडे सर्वात जास्त लक्ष देता, राजकारण करताना सामाजिक हित कसे जोपासता, निवडणूक लढवताना कोणत्या मुद्द्यांचा वापर प्रचार तंत्रात केला व निवडणुकीतील आश्वासने कशा रीतीने पूर्ण केले, अशा विविध मुद्द्यांचा समावेश असलेला परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले होते.
या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सरपंच ग्रामसेवक यांनी या आयोजित केलेल्या "ग्राम परिषद 2022" व "सरपंच रत्न पुरस्कार, ग्रामरत्न पुरस्कार 2022 या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले. संपर्क 9545891515
COMMENTS