मनसे चे उपजिल्हा प्रमुख महिबूब सय्यद यांचा स्तुत्य उपक्रम विसर्जना दिवशी गणेश भक्तांसाठी केले महाप्रसादाचे आयोजन! पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव द...
मनसे चे उपजिल्हा प्रमुख महिबूब सय्यद यांचा स्तुत्य उपक्रम विसर्जना दिवशी गणेश भक्तांसाठी केले महाप्रसादाचे आयोजन! पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी केले कौतुक!
शिरूर (प्रतिनिधी ) - मनसे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी मनसेच्या वतीने गणेश विसर्जना निमित्त शनी मंदिर विसर्जन घाट येथे लोकसहभागातून महाप्रसादाचे आयोजन केले होते. शिरूर शहरात प्रथमच गणेश विसर्जना दिवशी गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
महाप्रसादाचा सुमारे अडीच ते तीन हजार गणेश भक्तांनी लाभ घेतला. या महाप्रसादाच्या आयोजना मुळे गणेश विसर्जनासाठी आलेल्या बँड पथकांतील समाधान व्यक्त केले. तसेच मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी यात सहभाग या उपक्रमाचे कौतुक केले.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, असे उपक्रम सर्वत्र होणे गरजेचे आहे.
प्रवासी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे म्हणाले कि,लोकसहभागातून केलेले महाप्रसादाचे आयोजनाचा लाभ हजारो गणेश भक्तांनी घेतला याचे समाधान वाटते.ते पुढे म्हणाले की, शिरूरकर नेहमीच अस्या चांगल्या उपक्रमास मदत करत असतात. लॉकडाऊन च्या काळात लोक सहभागातून मोठया प्रमाणात अन्नदान केले. त्यास शिरूर शहरातील दानशूर व्यक्तीन्नी भरभरून मदत केल्यानेच ते शक्य झाले.
यावेळी उपअधिक्षक यशवंत गवारे , पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, तहसिलदार डॉ.सुनिल शेळके,मुख्याधिकारी ॲड.प्रसाद बोरकर,मा.नगराध्यक्ष वैशाली वाखारे, राजेंद्र क्षिरसागर ,नसिमखान,भाजपा संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती मा.उपसभापति प्रविण चोरडिया, सचिव अनिल ढोकले,बंडू जाधव,मा.नगरसेवक रविंद्र धनक, दादाभाऊ वाखारे, जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष संजय बारवकर,ॲंड.प्रदिप बारवकर,ॲड.विलास खांडरे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.केलेली मदत हि योग्य ठिकाणी योग्य प्रकारे लागणे गरजेचे असते.
आयोजकांनी सांबर,भात, पायनापल शिरा ,पाणी प्रशस्त बसण्याच्या व्यवस्थेसह सुयोग्य नियोजन केले होते. तसेच दुसऱ्या दिवशी आयोजकांनी आयोजित महाप्रसादाच्या ठिकाणची स्वच्छता करून नवा आदर्श निर्माण केला.
म न से पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघ अध्यक्ष अनिल बांडे, सुनिल खेडकर,मा.शहराध्यक्ष संदिप कडेकर, ॲड आदित्य मैड, रवि लेंडे, कांतिलाल शर्मा, भाजपचे सोशल मीडियाचे विजय नरके, हुसेन शहा,शुभम जाधव, बहुजन पालक संघाचे अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे, फिरोजभाई सय्यद, शोभाताई परदेशी, भगवान श्रीमंदिलकर, गणेश खोले,रहीबर शहा, रेहान शहा,सुदाम चव्हाण, संजोग चव्हाण, गोपीनाथ पठारे , संदिप बिहाणी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
COMMENTS