नगर प्रतिनिधी : ( संजय महाजन ) साई गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूल शिर्डी येथे आपल्या देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाले, त्या...
नगर प्रतिनिधी : ( संजय महाजन )
साई गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूल शिर्डी येथे आपल्या देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाले, त्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
त्यामध्ये शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या असे की रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये मोठ्या संख्येने मुलांनी सहभाग घेतला. मुलांना शाळेत झेंडे वाटण्यात झाले व "हर घर झेंडा या उपक्रमात त्यांनी ते दि. 13/8/2022 ते 15/8/2022 या दिवसापर्यंत मुलांनी आपल्या घरी लावले.
ना भुतो ना भविष्याती असा दिमाखदार सोहळा साजरा करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी 'आझादी का अमृत महोत्सव' यामध्ये, १८५७ चा उठावाचा चित्ररथ साजरा केला. त्यामध्ये सर्व नेत्यांची वेशभूषा सादर केल्या. 'मंगल पांडेला' फाशी देतांना चे दृश्य दाखविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे संस्थापक श्री.तान्हाजी वामनराव गोंदकर सर प्रिन्सिपल मंगला नानासाहेब कुहे मॅडम तसेच उपसंस्थापक सौ. कांचन तान्हाजी गोंदकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील इतर शिक्षकवृंद शर्मा मैडम, घर मैडम, राठोड मॅडम, दिये मैडम, मिरके मैडम, सपकाळ मैडम, कुमावत मैडम, चौधरी मॅडम, राजपूत मैडम, अक्चर मॅडम, सोनवणे मॅडम, मेशराम मॅडम, चौधरी सर, भालेराव सूर तसेच वाघ मामा, वर्षा मावशी, जाधव मामा, डगले मामा या सर्वांचे सहकार्य लाभले.
COMMENTS