गुरुवर्य वै. हभप वाघचौरे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गाथा पारायण शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) शिर्डीत दिनांक 29 ऑगस्ट 2022 ते 05/09/...
गुरुवर्य वै. हभप वाघचौरे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गाथा पारायण
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शिर्डीत दिनांक 29 ऑगस्ट 2022 ते 05/09/2022 रोजी गुरुवर्य वैकुंठवासी हभप लक्ष्मण महाराज वाघचौरे यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे,
प. पु. गुरुवर्य वै. लक्ष्मण महाराज वाघचौरे यांचे संतकार्याचा उल्लेख केला तर त्यात प्रामुख्याने जाणवेल की, महाराजांचे कार्य हे वारकरी संप्रदायाचे कार्य , बहुजनांना एकत्रित करून सांप्रद धर्म वाढवण्याचे कार्य आहे , त्यांनी सन 1964 साली शिर्डी ते पंढरपूर ही पहिलाच पायी दिंडी सोहळा सुरू केला त्यास ह्या वर्षी 57 वर्ष पूर्ण झालेत तसेच त्यांनी पुढे शिर्डी ,राहता ,कोपरगाव परीसरातील सर्व भाविक भक्तांना बहुजनांना एकत्रित येऊन हा पायी दिंडी सोहळा वाढविला देखील, या सर्वात प्रामुख्याने सामील हभप शंकर महाराज ,हभप गोपाळ महाराज गुडे, हभप रामभाऊ महाराज शिंदे, चोपदार गोविंद गुडे ,विणेकरी बाबुराव शिंदे, तसेच हभप बाबूराव गुडे यांचा प्रामुख्याने नामोउल्लेख करावा लागेल ,त्यामुळे या दिंडीला *वैदांची दिंडी* असे संबोधले जायचे सरला बेटातील वै.हभप नारायणगिरी महाराज व वै.हभप लक्ष्मण महाराज वाघचौरे हे समकालीन होते.
वै. हभप लक्ष्मण महाराज रामकृष्ण वाघचौरे यांचा जन्म सन 01/07/1918 साली तिळवण तेली समाजात झाला व त्यांचे वैकुंठगमन 02/09/2006 साली झाले,शिर्डी येथे पांडुरंगाचे मंदिर व्हावे ही गुरुवर्य हभप वै लक्ष्मण महाराज वाघचौरे यांची मनापासून अतिशय उत्कट इच्छा होती गरज होती जागेची त्याकामी हभप भास्कर महाराज गोंदकर यांनी 10 गुंठे जागा उपलब्ध करून दिली व वै. हभप वाघचौरे महाराजांनी 5 लाख रुपयांची देणगी मंदिर उभारणी कामी दिली गुरुवर्य वै हभप लक्ष्मण महाराज वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रुख्मिनी मंदिर ट्रस्टची स्थापना सन 01/07/2001 साली करण्यात आली त्यावेळी संस्थापक अध्यक्ष म्हणून गुरुवर्य वै.हभप लक्ष्मण महाराज वाघचौरे तर उपाध्यक्ष म्हणून हभप भास्कर महाराज गोंदकर यांनी काम पाहिले तर हभप दत्तात्रय लुटे व हभप यशवंत वाघचौरे व इतर अनेक वारकऱ्यांनी आज त्यांचा वारसा मोठ्या उत्साहाने व गुण्यागोविंदाने चालवत आहे.
खरे तर गुरुवर्य हभप वै लक्ष्मण महाराज वाघचौरे यांच्या विषयी सांगायचे झाले तर ते खूपच शिस्तप्रिय व स्वाभिमानी होते , कीर्तनाचे पैसे घेऊ नका हा त्यांचा आग्रह, " भंग्याचा धंदा करून पोट भरावे पण परमार्थाचा पैसा घेऊ नये असे महाराज कायम म्हणत, शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडी, शिर्डी ते वणी पायी पदयात्रा तसेच श्री साई सतचरित्र पारायण सोहळा व्हावा व यासाठी श्री मिराणे सर यांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य हभप वै लक्ष्मण महाराज वाघचौरे यांचे संतकार्य निरुपम आहे अजरामर आहे अशी माहिती दिली व गाथा पारायणास उपस्थित राहण्याचे आवाहन केले त्यांचे पुतणे व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी हभप यशवंत वाघचौरे यांनी केले यावेळी हभप दत्तात्रय लुटे, अॅड.विक्रांत वाघचौरे, दीपक चौधरी, बद्रीनाथ लोखंडे, शशीकांत महाले उपस्थित होते.
COMMENTS