श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीची ६५ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) श्...
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीची ६५ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीची वार्षीक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २९.०८.२०२२ रोजी श्री साईबाबा संस्थानचे साईआश्रम-२ येथील हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते पा. होत्या नियोजीत अध्यक्षाना अध्यक्षस्थान स्विकारण्याची सुचना संस्थेचे संचालक तुषार सुदामराव शेळके. पा. यांनी मांडली त्यास संस्थेचे विद्यमान व्हा. चेअरमन दिनेश दिलीप कानडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभेच्या नियोजीत अध्यक्षा व विद्यमान चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते पा. यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्विकारुन दिवंगतांना श्रध्दाजली अर्पण केली सभेमध्ये एकुण वीस विषय चर्चेसाठी घेवुन त्यावर सविस्तर चर्चा होऊन सर्व विषय एक मताने संमत करण्यात आले. संस्थेचे आधास्तंभ आमदार राधाकृष्णजी विखे पा. तसेच मार्गदर्शक मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पा. यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने संस्थेच्या व सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले त्यात नियोजीत अध्यक्षांना अध्यक्षस्थान स्विकारणेस विनंती करणे, श्रध्दाजंली ठराव, मागील सभेचे प्रोसिडींग वाचन, 65 वर्षीय सेवानिवृत्त साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या सिल्वर कॉइन व शाँल देऊन सत्कार करण्यात आला. लेखापरिक्षण अहवालाची नोंद व दोष दुरुस्ती, बँक कॅशक्रेडीट कर्ज नुतणीकरण, लेखा परिक्षक व टॅक्स सल्ल्लागार व लेखापरिक्षक नेमणुक, अर्थिक पत्रके व आर्थीक अंदाज पत्रकास तसेच नफा वाटणीस मान्यता, उपविधी दुरुस्ती, मकर संक्रांत हाळदी कुंकू समारंभाचे आयोजन, दिपावली सप्रेमभेट वस्तु व शिधा वाटप, नफा वाटणी, में. डिव्हिडंड ठेव व्याज वाटप, संस्थेच्या साईज्योत इमारती बाबत विचार करणे, तसेच ऐनवेळच्या विषयांवर सविस्तर चर्चा होवुन सर्व विषय एक मताने संमत करण्यात आले. मेंबर डिव्हिडंड १५%, सभासद ठेव व सेवक ठेवीवर १०% व सभासद वर्गणीवर १०% प्रमाणे व्याजाचे वाटपास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. संस्थेचे सचिव नबाजी नामदेव डांगे पा. यांनी विषय पत्रिका, मागील सभेचे प्रोसिडींग, आर्थीक पत्रकांचे वाचन करुन संस्थेच्या आर्थीक परिस्थितीची माहिती दिली. सदर प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन दिनेश दिलीप कानडे, संचालक यादव माधव कोते पा., प्रतापराव संपतराव कोते पा., तुषार सुदामराव शेळके पा., जितेंद्र साहेबराव गाढवे पा., विलास पंढरीनाथ गोंदकर पा., विठ्ठल तुकाराम पवार पा., संचालीका सौ. मिरा संजय कोटकर पा., दिपक भाऊसाहेब घुमसे, संदिप भाऊसाहेब बनसोडे, तज्ञ संचालीका सौ. निर्मला दिगंबर सलगरकर, संस्थेचे सचिव नबाजी नामदेव डांगे पा., सहसचिव विलास गोरख वाणी पा. तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. शेवटी संचालक तुषार सुदामराव शेळके पा. यांनी संस्थेचे आधास्तंभ आमदार राधाकृष्णजी विखे पा. तसेच मार्गदर्शक मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पा., संस्थानचे आशुतोष दादा काळे साहेब व त्यांचे विश्वस्त मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, उप मुख्य कार्यकारी साहेब, सर्व प्रशासकिय अधिकारी तसेच सर्व सभासदांचे आभार मानले.
COMMENTS