श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल फेअर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांना निवेदन शिर्डी प्रतिनिधी : (...
श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल फेअर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांना निवेदन
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शिर्डी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल फेअर संघटनेच्या वतीने श्री साईबाबा संस्थान मधील कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित सेवा अंतर्गत अश्वासित प्रगती योजनेच्या दहा वीस व तीस वर्षा च्या सेवेनंतर मिळणारे लाभ संस्थान मधील कर्मचाऱ्यांना लागू करावे सातवा वेतन आयोग संस्थान मधील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला आहे परंतु सातवा वेतन आयोगानुसार दहा वीस व तीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणारे लाभ संस्थान कर्मचाऱ्यांना लागू करावे अशा आशयाचे निवेदन श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत यांना देण्यात आले यावेळी बानाईत मॅडम यांनी या विषयात लक्ष घालून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सातव्या वेतन आयोगानुसार दहा विस व तिस वर्षाच्या सेवे नंतर मिळणारे लाभ लागू करूअसे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले संघटनेच्या वतीने निवेदन देताना संघटनेचे संस्थापक प्रतापराव कोते, अध्यक्ष अरुण जाधव, रवींद्र सुरळे मच्छिंद्र औताडे प्रल्हाद मुंगसे प्रमोद चिने, विनोद कांदळकर, नवनाथ जाधव, दत्तात्रय ठोंबरे, रंभाजी गागरे ज्ञानेश्वर सोनवणे व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS