महसूल आणि ग्रामविकास विभागाचे प्रभारी अधिकारी करता आहेत 'म' 'म' म्हणतं 'कारभार' शिरूर ( प्रतिनिधी ) - वाळू उपशासा...
महसूल आणि ग्रामविकास विभागाचे प्रभारी अधिकारी करता आहेत 'म' 'म' म्हणतं 'कारभार'
शिरूर ( प्रतिनिधी ) -
वाळू उपशासाठी सर्वोत्तम महसूल मिळवून देण्याबरोबरच ग्रामविकास विभागातील प्रत्येक काम अधिक सक्षमपणे शिरूर तालुक्यात होत होते.मात्र गेली वर्षभर तहसिलदार पद तर चार महिन्यांपासून गटविकास अधिकारी पद रिक्त आहेत.या दोन्ही विभागाचे कामकाज करणारे प्रभारी अधिकारी फक्त 'म' 'म' म्हणतं पगारासाठी दिवस भरत आहेत.याकडे लोकप्रतिनिधींनी सुध्दा आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे कि काय,असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी कोणी देता का हो,अशी एका सामाजिक कार्यकर्त्याने तहसिलदार कार्यालयाच्या परिसरात आरोळी ठोकली.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मुबलक काळ सोनं होते,तेव्हा महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तुपाशी खातं होते.त्याला ग्रामपंचायतीची साथ मिळत असल्याने महसूल आणि ग्रामविकास विभागाचे कारभारी 'मिलीभगत' ठेवून तोऱ्यात फिरताना दिसत होते. शिरुर तहसिलदार, गटविकास अधिकारी या पदासाठी थेट मंत्रालय स्तरावरुन जणू लिलाव होऊन परफेक्ट कनेक्शन लावून अनेक जण आजपर्यंत कारभारी झाले.मात्र वाळू उपसा बंद झाला की 'वासे फिरले' आता गेली वर्षभर तहसिलदार तर चार महिन्यांपासून गटविकास अधिकारी पदावर प्रभावी चार्ज देऊन फक्त कामकाज सुरू ठेवले आहे. यामुळे अनंत अडचणी निर्माण झाल्या असून हि लोकप्रतिनिधी सुध्दा शांत आहेत. प्रभारींचा कारभार संथगतीने आणि निर्णय न घेणारा असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाळू उपसा सुरू होता तोपर्यंत शिरुर तालुक्याची मोठी महती होती. तलाट्यापासून ते तहसिलदारांपर्यंत सर्वांचा त्या सुवर्ण काळात मुक्त संचार आणि ऐशोआराम बघण्या सारखा होता. वाळू उपसा बंद झाला की अक्षरशः तालुक्यातील तहसिलदार आणि गटविकास अधिकारी पदाची 'रया' गेली की काय अशी अवस्था झाली आहे. एक वर्षांपासून तहसिलदार पदासाठी इच्छुक कोणीच नसल्याने खुर्चीवर प्रभारी बसवून कारभार नाही तर फक्त कामकाज सुरू आहे.
तशीच अवस्था गटविकास अधिकारी पदाची झाली आहे. शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे पद भुषणावह होते. आत्तापर्यंत या तालुक्याच्या लौकिकात भर टाकण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी उत्तम कारभार केला. याठिकाणी येण्यासाठी सुध्दा चढाओढ असायची. मात्र
प्रत्येक चार महिन्यांपासून गटविकास अधिकारी या पदावर प्रभारी अधिकारी बसवून कामकाज सुरू ठेवले आहे.
दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त असूनही लोकप्रतिनिधींना बहुतेक माहिती नसल्याने या पदासाठी सक्षम अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी प्रयत्न केले नसावेत. फक्त निवडणूकीच्या काळात फुल्ल चार्ज असणारे लोकप्रतिनिधी सध्या डिस्चार्ज झाले की काय, असे काही सामाजिक कार्यकर्ते उघड बोलू लागले आहेत.
मंत्रीमंडळ अजून स्थिर नाही, तहसिलदार आणि गटविकास अधिकारी पद रिक्त त्यामुळे राज्य स्तरावर मंत्रीमंडळाचे भवितव्य न्यायालयीन कात्याकुटा नंतर स्थिर कि अस्थिर ठरेल.तर शिरूर तालुक्यातील महसूल आणि ग्रामविकास कामकाज अगदी गावपातळीवर पर्यंत फक्त 'म' 'म' म्हणत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
COMMENTS