शिरूर शहरातील आरो प्लांट मधील गोळा होणाऱ्या पैश्यांचा मोठया प्रमाणात होतोय अपहार!मुख्याधिकारी कधी शोधणार यातील वाटेकरी!- अजय कोठारी शिरूर ...
शिरूर शहरातील आरो प्लांट मधील गोळा होणाऱ्या पैश्यांचा मोठया प्रमाणात होतोय अपहार!मुख्याधिकारी कधी शोधणार यातील वाटेकरी!- अजय कोठारी
शिरूर (प्रतिनिधी )
शिरूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. यासाठी दानशूर उद्योगपती प्रकाश भाऊ धरिवाल यांनी शिरूर शहरातील विविध भागात आपल्या सी एस आर निधीतून आरो प्लांट बसविण्यात आले. आरो प्लांटमुळे शहरातील नागरिकांना अवघ्या पाच रुपयामध्ये वीस लिटर स्वच्छ पाणी मिळत असल्याचे अजय कोठारी यांनी जागृत शोधशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शिरूर शहरातील नागरिक हे पिण्याचे पाणी हे परिसरातील खाजगी R O प्लांट धारकांकडून विकत घेत होते.त्यांची मोठी लूट होत होती एका हंडाभर पाण्यासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागत होते. याचा विचार करून प्रकाशभाऊ धरिवाल यांनी शिरूर शहरात मारुती आळी, स्टेट बँक कॉलनी, गुरुकुल सोसायटी,भाजी बाजार, जिजामाता गार्डन, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, काची आळी इत्यादी ठिकाणी R O प्लांट बसविले. या सर्व R O प्लांटची देखभाल शिरूर नगरपालिकेकडे आहे.
R O प्लांट मधून सुमारे एक ते दिड हजार अंदाजे पाण्याचे जार नागरिक घेऊन जात असल्याचे निरीक्षण अजय कोठारी यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले कि,एका जारचे पाच रुपया प्रमाणे रोज पाच ते सहा हजार रुपये गोळा होतात. R O प्लांट मधील कॉईन बॉक्स मधील रक्कम हि नगरपालिकेचा कर्मचारी हे नगरपालिकेत जमा करत आहेत. मात्र कॉईन बॉक्स मधील रक्कम व जमा होत असलेली रक्कम यात मोठ्ठा फरक असल्याचे कोठारी यांनी सांगितले.
R O प्लांट मधिल कॉइन बॉक्स मधिल जमा होणाऱ्या रक्कमेत मोठा भ्रस्टाचार होत असल्याचा आरोप अजय कोठारी यांनी केला. भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
COMMENTS