शिरूर (प्रतिनिधी ) - सत्ताधारी शिरूर शहर विकास आघाडीचे समर्थक किरण बनकर यांनी शिरूर नगरपालिका स्वच्छता विभागा च्या कारभारा विषयी सोशल मीडि...
शिरूर (प्रतिनिधी )- सत्ताधारी शिरूर शहर विकास आघाडीचे समर्थक किरण बनकर यांनी शिरूर नगरपालिका स्वच्छता विभागा च्या कारभारा विषयी सोशल मीडियावर खंत व्यक्त केली. त्यांनी काकस्पर्श या मथळ्याखालील टाकण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कारभाराबाबत किरण बनकर यांनी आपली खदखद व्यक्त करताना, शिरूर शहरातील चिकन व मटन शॉप यांच्या दुकानातील जमा होणाऱ्या घाणीबाबत खदखद व्यक्त केली आहे.
चिकन व मटन शॉप निर्माण होणारी घाण शनी मंदिर परिसर,भाजी बाजार, हलदी मोहल्ला परिसरातील नाल्या व रस्त्याच्या कडेला टाकण्यात येते असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्या परिसरामध्ये काकस्पर्शाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.असा त्यांनी उल्लेख केलेला आहे.यामधूनच त्यांनी स्वच्छता विभागाच्या कारभारावर बोट दाखवलेले आहे. सदरील कचरा व निर्माण होणारे घाण यांची विल्हेवाट लावणे ही सर्वस्वी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाची जबाबदारी असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रामुख्याने दिसत आहे. करोडो रुपये खर्च करूनही शिरूर नगरपालिकेचा स्वच्छ भारत अभियानामध्ये दोन अंकी समावेश आहे.सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी असूनही त्यांनी प्रामाणिकपणे शहरातील स्वच्छतेवर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
COMMENTS