शिर्डी विमानतळ परिसर विकासाला चालना देण्याची गरज : अरविंद कोते शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) शिर्डीत आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण झाल...
शिर्डी विमानतळ परिसर विकासाला चालना देण्याची गरज : अरविंद कोते
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
शिर्डीत आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण झाले. विमानतळाला भाविकांचा प्रतिसाद मिळाल्याने राज्यात सर्वाधिक प्रवाशी असलेले शिर्डी एअरपोर्ट तिस-या स्थानावर असताना विमानतळ परिसर विकासाला चालना देण्याची गरज आहे. नाईट लँडिंगबरोबरच नवीन अत्याधुनिक टर्मिनलची निर्मिती सुशोभीकरणाला गती देण्यात यावी, अशी मागणी युवा नेते अरविंद कोते यांनी केली आहे. शिर्डी हे जागतिक दर्जाचे तिर्थक्षेत्र आहे. शिर्डीत जगातील विविध देशातून भाविक साईंच्या दर्शनाला येतात. भाविकांची गरज विचारात घेवून सरकारने शिर्डीत अंतरराष्ट्रीय दर्जा असलेले विमानतळ सुरू केले. या विमातळाला प्रतिसादही मिळाला. मात्र विमानतळ आणि परिसराचा विकास होत नाही. एअरपोर्ट टर्मिनलच्या नुतनीकरणाबरोबरच नाईटलँडींगचेही काम पुर्णत्वास जात नसल्याने रात्रीची विमानसेवा शिर्डीतून सुरू होऊ शकली नाही. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे यांची शिर्डी विमानतळाला समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्यास मदत होणार आहे. खासदार सुजय विखे यांनी शिर्डी विमानतळाच्या प्रलंबित कामासाठी लोकसभेत आवाज़ उठवून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही लक्ष वेधले आहे. काकडी सारख्या गावात विमानतळ सुरू झाल्याने या गावात रोजगाराची मोठी संधी आहे. मात्र विमानतळ परिसरात विकासाची कामे झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. त्यासाठी नियोजनबध्द नियोजनाची गरज आहे. महसुलमंत्री विखे, खासदार विखे त्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे कोते म्हणाले.
COMMENTS