न्याहळोद सीआरपीएफ जवानाचे जंगी स्वागत शिर्डी प्रतिनिधी संजय महाजन न्याहाळोद येथील सीआरपीएफचे जवान...
न्याहळोद सीआरपीएफ जवानाचे जंगी स्वागत
शिर्डी प्रतिनिधी संजय महाजन
- न्याहाळोद येथील सीआरपीएफचे जवान चंद्रकांत छबिलदास जिरे याने सैन्य दलात जीवाची पर्वा न करता 21 वर्ष अहोरात्र देशाचे रक्षण केले, प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीनंतर घरी परतल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ निवृत्त लेफ्टनंट कर्नल एस पी बोरसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आदेशक निकम, सदाशिव सोनवणे, एम एच पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेला मानवंदना देऊन करण्यात आली. यावेळी प्राध्यापक एम एस पाटील, झी 24 तास चे प्रतिनिधी प्रशांत परदेशी, ज्ञानेश्वर भोगे, राहुल महाजन, प्रकाश वाघ, एस के सोनवणे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त सैनिक चंद्रकांत जिरे यांच्या पत्नी सौ मेघा जिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझे पती सुखरूप घरी आले याचा मला खूप आनंद आहे असे गौरव कर त्यांच्या आई गोकुळ ताई यांनी देखील मुलगा सुखरूप आला असून आता त्याने गावाची सेवा करावी असे सांगितले. यावेळी माजी सरपंच कैलास पाटील, विकास पवार, मंगेश नवरे, योगेश जाधव, विकास रायते, राजू जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS