अभिनेते किरण भालेराव यांनी घेतले गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन ... आदिनाथ ढाकणे शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन) कोपरगाव शहरातून वाहणा...
अभिनेते किरण भालेराव यांनी घेतले गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन ... आदिनाथ ढाकणे
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन)
कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी वसलेल्या की ज्या ठिकाणी कोणतेही शुभकार्य करण्यास कोणत्याही प्रकारचा मुहूर्त लागत नाही असे जगभरातील एकमेव प्रसिद्ध असलेल्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचे झी मराठी या चॅनेल वर सुरू असलेल्या तू तेव्हा तशी या मराठी मालिकेतील चंदू चिमणे हे पात्र निभावणारे हास्य कलाकार किरण भालेराव याने नुकतेच मनोभावे दर्शन घेत पूजा आरती केली आहे.
या प्रसंगी गुरु शुक्राचार्य मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या शुभहस्ते अभिनेते किरण भालेराव यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपप्रमुख प्रसाद पर्हे, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, भागचंद रुईकर, संजय वडांगळे, बाळासाहेब लकारे,धिरज बच्व, सागर केकाण,मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा, गुरु राजेंद्र उक्कडगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते
सध्या हिंदू धर्मातील पवित्र असा श्रावण महिना सुरू असून या महिन्यात प्रत्येक मंदिरात मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी असते त्या अनुषंगाने मालिका अभिनेते किरण भालेराव यांच्या हस्ते तसेच शिंगणापूर गावचे सरपंच सुनीता भीमराव संवत्सरकर व भीमराव संवत्सरकर यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मंदिरात पुजा आरती आयोजित करण्यात आली होती. या पूजे नंतर अभिनेते भालेराव यांनी मंदिर व्यवस्थापन कडून परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांविषयी तसेच मंदिराविषयी माहिती जाणून घेत संपूर्ण मंदिर परिसराची बारकाईने पाहणी करत परिसर स्वच्छतेचे विशेष कौतुक करत सर्व मंदिर व्यवस्थापन समितीचे धन्यवाद व्यक्त केले.
COMMENTS