शिरूर ( प्रतिनिधी ) - रामलिंग ता.शिरूर येथील श्री.संत सेना महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री.संत सेना महाराज यांची पुण्यतिथी...
शिरूर ( प्रतिनिधी ) -
रामलिंग ता.शिरूर येथील श्री.संत सेना महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री.संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
मंगळवार दि.२३ रोजी श्री.संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त रामलिंग रोडवरील शिक्षक काॅलनी येथील नाभिक समाजाचे संत सेना महाराज मंदिर परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता.सकाळी अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज रासकर यांचे किर्तन व दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, रामलिंगचे मा.सरपंच विठ्ठल घावटे,माजी आदर्श सरपंच नामदेवराव जाधव, उपसरपंच नितीन बो-हाडे, सदस्य सागर घावटे,तुषार दसगुडे, बाळासाहेब देंडगे,यशवंत कर्डिले,अमोल वर्पे, हिरामण जाधव,समता परिषदेचे किरण बनकर,माजी नगरसेवक विनोद भालेराव,निलेश गाडेकर,बारा बलुतेदार महासंघांचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष योगेश जामदार,शिवसेनेचे शहरप्रमुख सुनिल जाधव,माजी शहर प्रमुख मयुर थोरात,मुकेश पाचर्णे,तुषार वेताळ, राष्ट्रवादीचे रविंद्र खांडरे,भाजपचे केशव लोखंडे,विजय नरके, रेश्मा शेख,रश्मी क्षिरसागर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरूर शहर नाभिक संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब क्षिरसागर,रणजीत गायकवाड, संतोष शिंदे,गोरख गायकवाड, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब गायकवाड, निलेश भोसले,संघटनेचे अध्यक्ष सनी थोरात,वैभव रायकर,सोमनाथ देवाडे,प्रितेश फुलडाळे,राजेंद्र कदम, संतोष वाघमारे,संतोष गायकवाड यांसह सर्व नाभिक बांधवांनी परिश्रम घेतले.
शिरूर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या दुःखद निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. दुःख बाजुला सारत त्यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांनी मंगळवार दि.२३ रोजी रामलिंग रोड शिक्षक कॉलनी येथील मंदिरात श्री संत सेना महाराज यांचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांना वा-यावर सोडणार नाही अशी ग्वाही देऊन राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत दिले.
COMMENTS