भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त ओम साई फाउंडेशनच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान शिरूर (प्रतिनिधी ) - सांगवी येथील स्वर्गीय इंद...
भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त ओम साई फाउंडेशनच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान
शिरूर (प्रतिनिधी ) - सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालया मधे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात ओम साई फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस कर्मचारी दिव्यांग कुणाल भालेराव यांच्या हस्ते मेणबत्ती रोजी करून नंतर उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा संत मदर तेरेसा हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सांगवी रुग्णालयातील डॉक्टर.तृप्ती मंगेश सागळे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सांगवी रूग्णालय डॉक्टर्स व कर्मचारी हे उत्तम प्रकारे नागरिकांची सेवा करतात त्यामुळे डॉ तृप्ती सागळे व त्यांच्या डॉक्टर सहकार्यांना संत मदत टेरेसा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे
असे त्याप्रसंगी अध्यक्ष संजय मराठे म्हणाले.सांगवी रुग्णालय अधिकारी नाव पुढील प्रमाणे डॉ.तृप्ती मंगेश सागळे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगवी रुग्णालय प्रमुख,डॉ.कोकरे श्रध्दा शिवाजीराव वैद्यकीय अधिकारी,डॉ.हांडे किशोरकुमार वसंतराव वैद्यकीय अधिकारी,डॉ.कुंदन प्रशांत पाटील वैद्यकीय अधिकारी,डॉ.नरके गोविंदा महादेव वैद्यकीय अधिकारी,डॉ.तुषार जाधव वैद्यकीय अधिकारी,डॉ.बिरादार सुप्रिया पांडुरंग वैद्यकीय अधिकारी,डॉ.वर्षा गवई स्त्री रोग तज्ञ,डॉ.सुधीर करवंदे भुलतज्ञ व डॉ.मोहन नलावडे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.शंकर बोरकर,डॉ.मेघा सूर्यवंशी यांना भारतरत्न संत मदर तेरेसा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासनचे संजय मराठे,प्रकाश बारथे,पंकज सारसर,सचिन अवघडे,रवी खोकर,सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटोळे,पुनम यादव आधी मान्यवर रुग्णालयाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी सूत्र संचालन पंकज सारसर यांनी केले तर आभार राजू आवळेकर यांनी मानले.
COMMENTS