नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाई करणार - पोलिस उपनिरीक्षक दातरे शिर्डी, राजेंद्र दूनबळे गणपती मंडळांना शासकीय प्रशासनाने नियमावली ठरवून दिली...
नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाई करणार - पोलिस उपनिरीक्षक दातरे
शिर्डी, राजेंद्र दूनबळे
गणपती मंडळांना शासकीय प्रशासनाने नियमावली ठरवून दिली आहे आहे या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशन तर्फे सावळीवर येथे गणेश मंडळांना गणपती बसविण्याकरिता गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना काही नियमावली ठरवून देण्यात आली आहे या करिता सावळीवीहीर येथे ग्रामपंचायत मध्ये पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली यावेळी यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दातरे
साहेब यांनी सांगितले की गणपती मंडळांना रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे, रस्त्याच्या कडेला गणपती मंडळांना परवानगी मिळणार नाही, डीजेला संपूर्ण बंदी ,पारंपारिक वाद्यांना मान्यता, समाजामध्ये तीड निर्माण होईल असे वातावरण निर्माण न करणे, गावामध्ये शांतता व जातीय सलोखा राखणे ,नियम मोडणाऱ्यानवर कार्यवाही होणार,
अशा पद्धतीच्या सूचना पोलीस प्रशासनातर्फे मंडळांना देण्यात आले याप्रसंगी सावळीविहीर चे ग्रामविकास अधिकारी खर्डे साहेब म्हणाले की 10 ते 12 मंडळे गावात असून या सार्वजनिक उत्सव आनंदात व शांततेने पार पाडणे गरजेचे आहे आपल्या कृत्यामुळे या धार्मिक उत्सवात गालबोट लागता कामा नये याची दखल सर्व नागरिकांनी घेणे गरजेचे आहे ,उपसरपंच गणेश कापसे म्हणाले की या कार्यक्रमातून कोणाच्या भावना दुखावणार नाही शांततेत व आनंदात हा हा कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे यासाठी प्रशासनाला ग्रामपंचायतीचे सहकार्य कायमस्वरूपी राहीलअसे ते म्हणाले याप्रसंगी पोलिस मकासरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश आगलावे माजी सरपंच अशोकराव आगलावे ,राजेंद्र कापसे पत्रकार राजेंद्र दुनबळे आधी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
COMMENTS