नगर-मनमाड महामार्गाचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन : दत्ता कोते शिर्डी प्रतिनिधी : नगर- शिर्डी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित राहिल...
नगर-मनमाड महामार्गाचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन : दत्ता कोते
शिर्डी प्रतिनिधी :
नगर- शिर्डी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित राहिलेला नाही. खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सरकारने येत्या सात दिवसांत या रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा मनसे नगर ते शिर्डी एकाच दिवशी जागोजागी आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे उत्तर नगरचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक दत्ता कोते यांनी दिला.
नगर मनमाड महामार्गाबाबत सरकारकडून अनेक वेळा घोषणा होऊनही काम सुरू होत नाही. अर्धवट खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. या रस्त्यावर साईबाबा आणी शनिशिंगणापूर ही महत्त्वाची देवस्थाने आहेत. देशातून शिर्डीला येणारे भाविक शनिशिंगणापुरलाही जात असल्याने त्यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील आमदार, खासदार या रस्त्याच्या प्रश्नावर गप्प आहेत. या रस्त्याचे काम सुरू झाले व काही दिवसात ते बंद का झाले, याची चौकशी होण्याची गरज आहे. याबाबत आपण मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या सात दिवसात या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू केले नाही, तर बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली जागोजागी एकाच दिवशी मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा कोते यांनी दिला आहे.
COMMENTS