निष्ठावान कार्यकर्त्याची अध्यक्षपदी वर्णी पुणे (प्रतिनिधी ) - मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी प्रसन्न चंद्रकांत ओ...
निष्ठावान कार्यकर्त्याची अध्यक्षपदी वर्णी
पुणे (प्रतिनिधी ) - मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी प्रसन्न चंद्रकांत ओझरकर यांची निवड झाली. खासदार सुप्रिया सुळे तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते ओझरकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी माण गावचे माजी उपसरपंच रवी बोडके, उपसरपंच शशिकांत धुमाळ, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष राहुल पवळे, माण ग्रामपंचायत सदस्य पंडित गवारे, शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पवळे तसेच युवावर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
माण गावचे रहिवासी असलेले प्रसन्न ओझरकर हे माजी सभापती पांडुरंग ओझरकर यांचे कट्टर समर्थक असून युवा वर्गामध्ये प्रसन्न यांची मोठी छाप आहे. सभापती करंडक या मुळशीतल्या सर्वात भव्यदिव्य व प्रभावी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाची यशस्वी धुरा संभाळून अत्यंत उत्कृष्ट रीतीने ती स्पर्धा पार पाडण्यात प्रसन्न यांनी मोठी भूमिका निभावली. त्यामुळे तालुक्यातल्या युवक वर्गात प्रसन्न ओझरकर हे नाव चांगलेच कोरले गेले.
निवडीनंतर बोलताना प्रसन्न ओझरकर यांनी सांगितले की सभापती पांडुरंग ओझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात युवकांचे संघटन करून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यात आग्रही राहणार आहे. राष्ट्रवादी पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असून खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे तसेच तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पुढील वाटचाल करणार असल्याचे सांगितले.
COMMENTS