प्रशिक्षणातून सक्षम होऊन गावाचा लौकिक वाढवावा - अजित देसाई गटविकास अधिकारी शिरूर शिरूर (प्रतिनिधी ) गावाने मोठ्या विश्वासाने पाच व...
प्रशिक्षणातून सक्षम होऊन गावाचा लौकिक वाढवावा - अजित देसाई गटविकास अधिकारी शिरूर
शिरूर (प्रतिनिधी )
गावाने मोठ्या विश्वासाने पाच वर्षे ग्रामपंचायतीचे विश्वस्त म्हणून जबाबदारी दिली आहे. कायद्याची माहिती, अधिकार, जबाबदारी,कर्तव्य, कामे,सभा,रेकॉर्ड सोबत ग्रामपंचायतीचे कामकाजाची ओळख प्रशिक्षणातून होणार आहे.प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानातून गावाचा सर्वांगीण लौकिक वाढविण्यासाठी सर्वोत्तम योगदान द्यावे, असे आवाहन गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी केले आहे.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषदे आणि रयत शिक्षण संस्थेचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र वर्ये-सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे महिला सदस्यांचे क्रांतीज्योती प्रशिक्षण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केले आहे.या प्रशिक्षणाचे उद् घाटन गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रशासकीय अधिकारी कारंजकर , प्राचार्य विजय जाधव, प्रविण प्रशिक्षक सुनंदा मांदळे, सुरय्या पठाण,लता मेगडे उपस्थित होते.
दि. २२ ते २४ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या प्रशिक्षणासाठी शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांना अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, सभा कामकाज, उत्पन्न वाढविण्यासाठी मार्ग, नेतृत्व कौशल्य, समित्यांची रचना आणि भुमिका, कर आकारणी, वसुली यासह अनेक महत्त्वाच्या विषयावर यशदा पुणे च्या तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
COMMENTS