शिरुर (प्रतिनिधी) समस्त हिंदूंसाठी पवित्र अशा श्रावण मासाची सुरुवात झालेली आहे, दिनांक ०८/०८/२०२२ दुसऱ्या सोमवारी विश्व हिंदु परि...
शिरुर (प्रतिनिधी)
समस्त हिंदूंसाठी पवित्र अशा श्रावण मासाची सुरुवात झालेली आहे, दिनांक ०८/०८/२०२२ दुसऱ्या सोमवारी विश्व हिंदु परिषद भीमाशंकर जिल्ह्याच्या वतीने बारा ज्योतर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर येथे मंदिर देवस्थान, पोलिस प्रशासन, सरकारी यंत्रणा, वैद्यकीय सेवा यांच्या सोबत बजरंग दल शिरूर शहर प्रखंडच्या बजरंग दलाच्या बजरंगी कार्यकर्त्यानी भाविकांच्या रांगा लावणे, मंदिर परिसरातील गर्दी कमी करणे, वैद्यकीय सेवा केंद्र दाखवणे, बसेस मध्ये ये जा करणाऱ्या प्रवासांना मदत करणे, मंदिरातील व्यवस्थचे कोट पणे पालन करणे, मंदिर परिसरातील स्वच्छता करणे, असे सेवाकार्य केले.
ह्यावेळी भीमाशंकर जिल्ह्याचे बजरंग दल संयोजक गणेश रौंधळ यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून ह्या सेवाकार्य उपक्रमास सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या सोमवारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूर प्रखंड संयोजक श्री अजिंक्य तारू व शहरातील 51 बजरंगी ईतर सहकारी अशी 70 जणांची टीम सेवा कार्यासाठी दाखल झाली होती. यावेळी श्री भीमाशंकर देवस्थान व्यवस्थापक समिती, खेड , मंचर पोलिस प्रशासन , वैद्यकीय अधिकारी, वनविभाग प्रशासन यांनी सर्व बजरंगी नी केलेल्या सेवा कार्याचे कौतुक केले. ह्या सेवाकार्यात दिव्यांग बजरंगी निलेश खोले यांनी धर्मकार्यासाठी शिवशक्तीने प्रेरीत होऊन सर्वबजरंगीच्या बरोबरीने आवर्जून सेवा कार्यात सहभाग नोंदवला.
COMMENTS