शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर शहर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणा-या आरोपीस शिरूर पोलिसांनी पिस्तुल व जिवंत काडतुसासह जेरबंद केले असून शि...
शिरूर (प्रतिनिधी )- शिरूर शहर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणा-या आरोपीस शिरूर पोलिसांनी पिस्तुल व जिवंत काडतुसासह जेरबंद केले असून शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३७ / २०२२ आर्म्स अॅक्ट क. ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांचे अनुशंगाने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पुणे ग्रामीण चे मा. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर भारतीय हत्यार कायदयांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिरूर पोलीसांकडून दक्षता घेण्यात येत आहे.त्या अनुशंगाने गोपनिय बातमीदारांचे सातत्याने संपर्कात राहिल्याने दि. २६ जुलै २०२२ रोजी सायंकाळी 5 वा. चे सुमारास पोलिस उप निरीक्षक पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे अरबाज रशीद खान हा सी टी बोरा कॉलेजच्या बाजुला हुडको कॉलनी रोड येथे त्याचे सोबत बेकायदेशिर विनापरवाना गावठी पिस्तुल जवळ बाळगुन फिरत आहे.अशी माहिती मिळाल.
बातमीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून आरोपीस पिस्तुलासह ताब्यात घेण्याबाबत पोलीस पथकास सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक पाटील, पो. कॉ. नेमाने, पो. कॉ. तायडे, पो. कॉ. साळुंके, चालक पो.कॉ. मांगडे यांना बातमी मिळाल्या ठिकाणी पाठविले असता तेथे इसम नामे अरबाज रशीद खान वय २३ वर्ष, रा. बाबुरावनगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे हा संशयास्पद मिळुन आला त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन १)२०,०००/- रु. किंमतीचे एक गावठी पिस्तुल २) ४०० /- रू. किंमतीचे दोन जिवंत काडतुस असा एकुण २०,४००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपीस देखील अटक करण्यात आलेली असुन अटक आरोपीकडे गुन्हयाचा अधिक तपास करून गुन्हयात आणखी आरोपींचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरु असल्याचे शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे,पुणे व उपविभागीय पोलीस अधिकारी,यशवंत गवारी शिरूर,यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,शिरूर पोलीस ठाणे, पोसई एकनाथ पाटील, पो.कॉ. नेमाने, पो.कॉ. तायडे, पो. कॉ. साळुंके, चालक पो. कॉ. मांगडे यांनी केलेली असुन याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३७ / २०२२ आर्म्स अॅक्ट क. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करीत आहेत.
COMMENTS