शिरूर(प्रतिनिधी) - बेट भागातील कृषी पंप चोरी करणारी टोळी शिरूर पोलीसांनी केली गजाआड मे. २०२२ रोजी आमदाबाद ता. शिरूर जि. पुणे येथुन एकाच वे...
शिरूर(प्रतिनिधी) - बेट भागातील कृषी पंप चोरी करणारी टोळी शिरूर पोलीसांनी केली गजाआड
मे. २०२२ रोजी आमदाबाद ता. शिरूर जि. पुणे येथुन एकाच वेळी ८ कृषी पंप चोरी गेले होते तसेच बेट भागामध्ये लागोपाठ कृषी पंप चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी कृषी पंप हे आवश्यक गोष्ट
असल्याने त्याच गोष्टीचा चोरी होत असल्याने शेतकरी हवाल दिल झाले होते व त्याबाबत समाज माध्यमा मधुन पोलीसांच्या कामगीरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. अभिनव देशमुख सो, पुणे ग्रा. यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री. सुरेशकुमार राउत यांना सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. सुरेशकुमार राउत यांनी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीसांचे वेगवेगळे पथके तयार करून सतत त्या गुन्हयाचे तपासामध्ये सातत्य ठेवुन पोलीस पथकाच्या मार्फत गुप्तबातमीदारा मार्फत माहीती काढुन कृषी पंप चोरी करणारी टोळी जेरबंद केलेली आहे. त्यामध्ये १) पांडुरग शिवाजी बोडरे वय २० वर्षे रा. रावडेवाडी ता. शिरूर जि. पुणे २) कुलदिप उर्फ मोन्या बबन बोडरे वय २० वर्षे रा. सदर ३) अजर हुसेन खान वय २२ वर्षे रा. सिन्नर नाशिक ४) अख्तर उर्फ कुल हुसेन खान वय २७ वर्षे रा. अहमदाबाद फाटा शिरूर ( भंगार व्यवसायीक ) यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचे कडुन १७ कृषी पंप, गुन्हा करण्यासाठी वापरत असलेली एक मो. सायकल व एक छोटा हत्ती असा माल हस्तगत करण्यात आलेला असुन एकुण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. इतर ही अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्याप्रमाणे अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.
सदरचे गुन्हे उघडकीस आल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचे शेतीसाठी उपयुक्त असलेले चोरीला गेलेले कृषी पंप त्यांना परत मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहे त्यामुळे बेट भागातील शेतकऱ्यांनीसमाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
वरील कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख सोो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. मितेश गटटे सेग, पुणे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत गवारी सोा, शिरूर यांचे मागदर्शना खाली मा. पोलीस निरीक्षक श्री. सुरेशकुमार राऊत सोो, शिरूर पोलीस ठाणे, सपोनि अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोना धनजंय थेउरकर, सहा. फौजदार नजिम पठाण, पो. कॉ. सुरेश नागलोत, विशाल पालवे, दिपक पवार, राजेंद्र गोपाळे, विनोद काळे होमगार्ड आकाश येवले व बिपीन खामकर या टिमने केलेली आहे.
COMMENTS