शिरूर (प्रतिनिधी ) - रांजणगाव एमआयडीसी ता शिरूर जि पुणे येथील डॉंगकॉंग कपंनीची १० लाखाची घरफोडी चोरी करणारे अज्ञात आरोपीतांना रांजणगाव एम...
शिरूर (प्रतिनिधी ) - रांजणगाव एमआयडीसी ता शिरूर जि पुणे येथील डॉंगकॉंग कपंनीची १० लाखाची घरफोडी चोरी करणारे अज्ञात आरोपीतांना रांजणगाव एमआयडी पोलीसांनी केले मुददेमालासह अटक
रांजणगाव एमआयडीसी मधील डाँगकॉग कपंनीची दिनांक २६/०६/२०२२ चे रोत्रौ ११.४५ ते दिनांक २७/०६/२०२२ रोजीचे पहाटे ००.३० चे दरम्यान अज्ञात आरोपीताने कंपीनीचे कपाऊंडवरून चढून कंपनीत प्रवेश करून कपंनीचे स्टुल रूम मधील किमती मशनरीचे पार्ट किंमत रू ९,९२,६२५ /- चा माल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता या अनुषंगाचे कंपनीचे एचआर श्री मंगेश नारायण देशमुख यांनी दिनांक ०७/०७/२०२२ रोजी रांजणगाव एमआयडीस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक विनोद शिंदे हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचे तपासात श्री बळवंत मांडगे साो पोलीस निरीक्षक रांजणगाव एमआयडीसी यांचे मागदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विनोंद शिंदे, सहा फौ दत्तात्रय शिंदे, पो हवा विजय सरजिनी पो हवा विलास आंबेकर, पो हवा संतोष औंटी पो कॉ विजय शिंदे पो कॉ उमेश कुमवळ यांचे टिमने सदर गुन्हयातील अभात आरोपीतांचा योग्य प्रकारे छडा लावुन गुन्हयात नमुद गुन्हयात कपंनीत चोरी करणारा रोशन आशेकराव मेश्राम रा वर्धा व त्यास मदत करणारा आरोपी नामे संजय रामकिसन तोतरे रा रांजणगाव यांना तसेच सदर गुन्हयातील चोरीचा माल बाळगणारे त्यांचे साथीदार रूपेश देवानंद गुरूतकर रा रांजणगाव व कैलास अंगत मुंडे रा चिखली पाटील नगर यांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपीताकडुन नमुद पोलीसांनी किंमत रू८,०६,९९९/- माल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई हि मा पोलीस अधीक्षक सो श्री अभिनव देशमुख साो, मा अपर पोलीस अधिकक्ष श्री नितेश गटटे सो मा उप वि पो अधि श्री यशवंत गवारी मा पोलीस निरीक्षक साो बळवंत मांडगे यांचे मागदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास करणारे पोलीस अधिकारी श्री विनोंद शिंदे पोलीस उप निरीक्षक रांजणगाव एमआयडीसी यांचेसह सहा फौ दत्तात्रय शिंदे, पो हवा विजय सरजिने पो हवा संतोष औटी पो हवा विलास आंबेकर पोलीस अंमलदार विजय शिंदे पोलीस अंमलदार उमेश कुतवळ यांचे पथकाने केलेली आहे.
COMMENTS