बाळ-गोपाळांच्या चेहर्यावरील आनंद हा समाधान देतो - सुवेंद्र गांधी अहमदनगर (प्रतिनिधी )- समाजात प्रत्येकाने आपण काही तरी देणे लागतो हा ह...
बाळ-गोपाळांच्या चेहर्यावरील आनंद हा समाधान देतो
- सुवेंद्र गांधी
अहमदनगर (प्रतिनिधी )- समाजात प्रत्येकाने आपण काही तरी देणे लागतो हा हेतू ठेवून वंचित घटकांना मदतीचा हात देणे कर्तव्य समजावे. गरज असलेल्या व्यक्तीला मिळालेली मदत खूप लाखमोलाची असते. बालकांना छोटीशी मदत पण खूप मोठी वाटत असते. बाळ-गोपाळांच्या चेहर्यावरील आनंद हा सर्वांना खूप समाधान देतो, असे असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुवेेंद्र गांधी यांनी केले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष व ओबीसी-व्हीजेएनटीचे प्रदेश कार्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवन रोडवरील आनंद बाल अभिनव विकास मंदिर येथील बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना नाभिक महामंडळाच्यावतीने केळी-बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आनंद साधना संस्थेचे मुख्य प्रवर्तक व नगरसेवक सुवेंद्र गांधी, प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड, जिल्हाध्यक्ष इंजि.बाळासाहेब भुजबळ, रामदास आहेर, विशाल सैंदाणे, श्रीपाद वाघमारे, रमेश बिडवे, वनिता बिडवे, जालिंदर बोरुडे, अनिल इवळे, शाम औटी, छाया नवले, उषा भगत, राणी पंडित, संपत पंडित, राजेश सटाणकर, रघुनाथ औटी, आदिनाथ बांगर, बन्सी दारकुंडे आदिंसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री.गांधी पुढे म्हणाले, बालघर प्रकल्पातील अनाथ मुलांसाठी खरी मदतीची गरज आहे. आम्ही त्यांना निवारा दिला. महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत करुन सर्वांनी सहकार्य करावे. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी ती येते हे योग्य आहे.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणाले, गेल्या वर्षी वंचित घटकांना आम्ही पावसाळ्यात ताडपत्री देऊन मदत सार्थक केली होती. यावर्षी बालघर प्रकल्पातील या चिमुकल्यांना खाऊचे वाटप करुन त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. भविष्यातही भरीव मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्तविकात मुख्याध्यापिका राळेभात मॅडम यांनी बालघर प्रकल्पाची माहिती दिली. विविध संस्था कायम मदतीचा हात देतात. तुम्ही देखील अशीच मदत सर्वांनी करुन सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कल्याण दळे यांच्या कार्याची माहिती दिली. ओबीसींना आरक्षण मिळाले हा एक आनंद असल्याने श्री.दळे यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याचे सांगितले.
नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवर रोडवरील बालघर प्रकल्पातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, बारा बलुतेदार महासंघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, रमेश बिडवे, रामदास आहेर, श्रीपाद वाघमारे, जालिंदर बोरुडे,वनिता बिडवे, छाया नवले, उषा भगत, राजेश सटाणकर, विशाल सैंदाणे, अनिल इवळे, शाम औटी, रघुनाथ औटी, शिक्षकवृंद आहे. (छाया : विजय मते)
COMMENTS