पुणे (प्रतिनिधी ) - बारा बलुतेदार महासंघांचे अध्यक्ष बहुजन ओबीसी नेते यांचा वाढदिव विविध सामाजिक उपक्रमांनी चिंचवड पुणे येथे साजरा करण्यात...
पुणे (प्रतिनिधी ) - बारा बलुतेदार महासंघांचे अध्यक्ष बहुजन ओबीसी नेते यांचा वाढदिव विविध सामाजिक उपक्रमांनी चिंचवड पुणे येथे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन बारा बलुतेदार महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी केले होते.
वाढदिवसा निमित्त शाहूनगर अष्टविनायक मंदिर चिंचवड पुणे येथे रक्तदान शिबिर, अन्नदान,वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्याचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.
यावेळी कुंभार समाजाचे नेते बारा बलुतेदार महासंघाचे संघटक सतीश दादा दरेकर,प्रदेश उपाध्यक्ष प्रतापरावजी गुरव,प्रदेश उपाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर,प्रदेश युवा अध्यक्ष विशाल जाधव,पुणे शहर अध्यक्ष ऍड सतीश कांबळे,चिंचवड शहर अध्यक्ष मोहन भागवत,पुणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा वैशाली पवार,शहरसुप्रिया चांदगुडे,पुणे महिला शहराध्यक्षा ऍड. प्रिया नाईक,पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा संगिता खरडे,केशव घोळवे शारदाताई मुंडे गणेश वांळुजकर संदिप चव्हाण व बाराबलुतेदार महासंघाचे व पुणे पिंपरी चिंचवड येथील कार्येकते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS