शिरूर (प्रतिनिधी) - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी- भंगार व्यवसायिकाचे अपहरण करून दरोडा टाकणा-या टोळीचा पर्दाफाश दिनांक 11/7/2...
शिरूर (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी- भंगार व्यवसायिकाचे अपहरण करून दरोडा टाकणा-या टोळीचा पर्दाफाश
दिनांक 11/7/22 रोजी रात्रौ 09.30 वा.चे शिक्रापूर चाकण रोडवरील भंगार व्यावसायिक नामे नसीर अबुबकर खान वय 19 वर्ष राहणार गॅस फाटा शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यास अज्ञात इसमांनी त्यांचे कडील पांढरे रंगाचे स्विफ्ट डिझायर कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण करून त्याचे खिशातील रोख 57 हजार रुपये व ॲपल कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मारहाण करून जबरीने काढून घेतला व त्यास दिनांक 12/7/22 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात स्थळी सोडून दिले, त्यावरून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी तपासाबाबत सूचना व मार्गदर्शन करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवत गोपनीय बातमीदारांना सूचना देऊन तपास करत असताना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १) करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे राहणार सोळु तालुका खेड जिल्हा पुणे याने त्याचे इतर साथीदारांची मदतीने स्विफ्ट डिझायर कारचा वापर करून केला असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने सदर पथकाने तपास सुरु करून, करण हनुमंत शिवाजी कांबळे यास फुलगाव परिसरात चिंचबन हॉटेलचे पाठीमागे शिवटेकडी जवळ पाटलाग करून ताब्यात घेतले, त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे इतर साथीदार नामे 2)रेहान हसन मोहम्मद खान वय 32 राहणार करंदी रोड गॅस फाटा शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे 3)अमर दिगंबर दिवसे वय 20 राहणार आंबेडकर नगर पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी 4) आकाश उर्फ डुब्या सोपान पानपट्टे रा. पूर्णा, तालुका पूर्णा जिल्हा परभणी 5) इमरान अजीमूलला खान वय 30 राहणार गॅस फाटा खालसा धाब्याजवळ शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे 6) मारी उर्फ सुरज नागसिंध खंदारे व त्यांचा 7)एक विधी संघर्ष मित्र यांचे मदतीने केल्याची कबुली दिल्यावरून त्याचे इतर साथीदारांना तुळापूर रोड चिंचबन हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉ. अभिनव देशमुख सो यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री मितेश घट्टे अप्पर पोलीस अधीक्षक सो पुणे, यशवंत गवारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, श्री अशोक शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी सचिन काळे,सहाय्यक फौजदार तुषार पंदारे,पोलीस हवालदार जनार्दन शेळके,पोलीस हवालदार राजू मोमीन,पोलीस नाईक मंगेश थिगळे,पोलीस नाईक योगेश नागरगोजे,सहाय्यक फौजदार मुकुंद कदम
यांनी केली आहे.सराईत गुन्हेगार करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे वरील गुन्हे
चाकण पोलीस स्टेशन
1) 28/2016 IPC 394,397
2) 78/2018 इतकं 394
3) 396/2015 IPC 379
दिघी पोलीस स्टेशन
1) 10/2016 IPC 379
खेड पोलीस स्टेशन
1) 527/2017 IPC 394,363
बीड शहर पोलीस स्टेशन
1) 126/2015 IPC 395,365,120
COMMENTS