शिरुर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने शिरुर नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील ५४ कर्मचाऱ्यांच्या वर्षभरासाठीचा आरोग्य विमा म...
शिरुर ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने शिरुर नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील ५४ कर्मचाऱ्यांच्या वर्षभरासाठीचा आरोग्य विमा मोफत उतरविण्यात आला आहे .
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मनसेचे जिल्हाचे उपप्रमुख महिबूब सय्यद यांनी दिली .
शिरुर नगरपरिषदेचा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांना विमा पॉलीसी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले .
यावेळी शिरुर प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे , मनसेच्या तारुआक्का पठारे , रविराज लेंडे , सुनील खेडकर,सुदाम चव्हाण , डॉ .वैशाली साखरे , शारदा भुजबळ , नाना लांडे ,बजाज अलायन्स चे चंदू बोरा ,नगरपालिका स्वच्छता विभागाच्या अभियंता राजश्री मोरे ,मनोज अहिरे आदी उपस्थित होते .
सय्यद यावेळी म्हणाले की शिरुर शहरात स्वच्छता ठेवण्याकामी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या विभागात ठेक्यावर काम करणा- या ५४ कर्मचाऱ्यांच्या बजाज अलायन्स संकटमोचन आरोग्य विम्या मनसेचा वतीने काढण्यात आला आहे . या विम्याचा काळावधी एक वर्षाचा असुन याकाळात कर्मचाऱ्यांस दुखापत अथवा अपघात झाल्यास नूकसान भरपाई म्हणून काही रक्कम मिळू शकणार आहे .शहराचे आरोग्य जपण्यासाठी व शहर सुंदर स्वच्छ रहावे यासाठी सतत ऑन ड्यूटी असणाऱ्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा विमा सामाजिक बांधिलकी मानून काढण्यात आला असून यापुढे ही विविध उपक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
फोटो ओळी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने शिरुर नगरपरिषद मधील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढण्यात आला .
COMMENTS