शिरूर (प्रतिनिधी) - मागील दाखल झालेल्या गुन्ह्यात मिटवा- मिटवी केल्याचा गैरसमजातून रिव्हॉल्वर मधुन फायरिंग करून एकास गंभीर जखमी केल्या प्...
शिरूर (प्रतिनिधी)-
मागील दाखल झालेल्या गुन्ह्यात मिटवा- मिटवी केल्याचा गैरसमजातून रिव्हॉल्वर मधुन फायरिंग करून एकास गंभीर जखमी केल्या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन जणास आठ तासात अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहित नुसार करडे गावचे हददीत मारूती मंदीराजवळ अंकुश सुदाम बांदल, धनंजय अशोक पाचर्णे,आकाश रोडे (सर्व रा. करडे ता. शिरूर जि. पुणे) यांनी पुर्वी दाखल गुन्हयात मिटवा मिटवी केल्याचा गैरसमज करून घेवून प्रकाश बाळु पाचर्णे यास शिवीगाळ करीत अंकुश बांदल याने रिव्हाल्वर घेवून प्रकाश पाचर्णे यास धमकावले व त्यानंतर रात्री 11.40 वा. तरडोबाचीवाडी येथील गोलेगाव ते शिरूर रोडवर डुंबरीचा ओढयाजवळ इनाव्हो कार नं. एमएच १२ एमएफ ८८६५ यामधुन जात असताना पुर्वी दाखल गुन्हयाबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे जात असताना प्रकाश पाचर्णे यांनी पुर्वी दाखल गुन्हयात मिटवा मिटवी केली याचा गैरसमज करून अंकुश सुदाम बांदल याने त्याचे कडील रिव्हॉल्वर प्रकाश यांच्या मानेला उजवे बाजुस लावुन रिव्हॉल्वर मधुन गोळी फायर करून जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी सुधीर पाचर्णे याने अंकुश बांदल यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यास ही जीवे मारण्याचे उददेशाने त्याचे दिशेने अंकुश बादल याने रिव्हॉल्वर मधुन फायर केला. त्याबाबत कैलास फक्कड पाचर्णे वय ४८ वर्षे रा. करडे पाचर्णेवस्ती ता. शिरूर जि. पुणे यांनी दिले तकारीवरून शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं. ३२३/२२ भा.द.वि.कलम ३०७,५०४,५०६,३४ भा.ह.का.क. ३,२५,२७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील आरोपीत नामे १) अंकुश सुदाम बांदल वय ३९ वर्षे २) धनंजय अशोक पाचर्णे वय ३२ वर्षे ३) आकाश तानाजी रोडे वय २९ वर्षे सर्व रा. करडे ता. शिरूर जि. पुणे यांना सापळा लावुन कर्डे येथुन अवघ्या आठ तासात अटक करण्यात आले. त्यांना कोर्टात हजर केले असता, ता. १०/०५/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश करण्यात आला आहे.
वरील कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, यांचे मागदर्शना खाली स्था.गु.अ.शाखापुणे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सपोनि सचिन काळे,पोसई गणेश जगदाळे,सो सहा. फौजदार तुषार पंदारे, पोहवा सचिन घाडगे, पोहवा राजु मोमीन, पोहवा जनार्दन शेळके, पोना मंगेश थिगळे, पोलीस अमलदार संजय साळवे व पो.अं.विजय जंगम सहभागी होते.
COMMENTS